अजित पवार यांनी अचानक बोलावली पत्रकार परिषद, मोठी घोषणा करणार?

| Updated on: Aug 21, 2024 | 7:51 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक उद्या संध्याकाळी पाच वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद बोलावली आहे. अजित पवार या पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी घडलेल्या घडामोडी पाहता अजित पवार यांच्या या पत्रकार परिषदेबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.

अजित पवार यांनी अचानक बोलावली पत्रकार परिषद, मोठी घोषणा करणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावली पत्रकार परिषद
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्या संध्याकाळी 5 वाजता मुंबईत पत्रकार परिषद बोलावली आहे. अजित पवार उद्याच्या पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. एमसीएच्या वानखेडे लाँच येथे उद्या ही पत्रकार परिषद होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या तापट स्वभावामुळे ओळखले जातात. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापनेसाठी जवळपास संपूर्ण हालचाली पूर्ण झाल्या होत्या. ज्या दिवशी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे जाणार होते त्याचदिवशी पहाटे अजित पवार यांनी भाजपसोबत पहाटेचा शपथविधी उरकला होता. पण हे सरकार 36 तासांच्या आत कोसळलं होतं. हेही असे की थोडे अजित पवार यांनी वर्षभरापूर्वी अचानक तडकाफडकी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. पण आता महायुतीत काही ठिकाणी विधानसभेच्या जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर खटके उडताना दिसत आहेत. या सर्व घडामोडी पाहता अजित पवार यांनी अचानक उद्या बोलावलेल्या पत्रकार परिषदेतेला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष तयारीला लागले आहेत. असं असताना महायुतीत काही ठिकाणी वादाची ठिणगी पडताना दिसत आहे. विशेष म्हणजे भाजपचेच कार्यकर्ते अजित पवार यांना काळे झेंडे दाखवताना बघायला मिळाले आहेत. दुसरीकडे कोकणात कर्जत विधानसभेच्या जागेवरुन शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्यात प्रचंड शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे.

नवाब मलिकांना भाजपचा विरोध

हेही असे की थोडे दोन दिवसांपूर्वी एक महत्त्वाची घटना बघायला मिळाली. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा रविवारच्या दिवशी मुंबईत दाखल झाली. त्यावेळी एक अनोखी गोष्ट बघायला मिळाली. आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचं स्वागत केलं. नवाब मलिक यांच्या अणुशक्ती नगर विधासभा मतदारसंघात अजित पवार यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवार आणि नवाब मलिक एकाच मंचावर बघायला मिळाले. तसेच अजित पवार आणि नवाब मलिक यांनी एकाच गाडीने प्रवास केल्याचं कॅमेऱ्यातही कैद झालं. दुसरीकडे नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा विरोध आहे. असं असताना अजित पवार आणि नवाब मलिक यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

हे सुद्धा वाचा

राजकारणात कधीही धक्कादायक घडामोडी घडू शकतात. कुठला नेता कधी कुणासोबत युती करेल, किंवा कुणासोबत काडीमोड करेल याचा भरोसा नाही. त्यामुळे प्रत्येक घडामोडीकडे राज्याच्या जनतेचं बारकाईने लक्ष असतं. अजित पवार यांनी याआधी महाराष्ट्राच्या राजकारणात दिलेले धक्के सर्वश्रूत आहेत. त्यामुळे उद्या अजित पवार यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा होते की, कुठला बडा नेता पक्षात प्रवेश करतो? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.