मुंबई : जादुटोणा विरोधी कायदा (Anti-witchcraft law) प्रचार व प्रसार अमंलबजावणी समितीने कामकाजाला गती देवून राज्यात ‘जादुटोणा विरोधी कायद्याची’ प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री यांच्या समिती कक्षात ‘जादुटोणा विरोधी कायद्याची’ प्रभावीपणे राबविण्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), वित्तिय सुधारणाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा,सामाजिक न्याय विभागाच्या अप्पर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा, जादुटोणा यांनी प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत 2013 हा अधिनियम संमत करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे.राज्यात ‘जादुटोणा विरोधी कायद्याची’ प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी प्रभावीपणे काम करावे. आजही अंधश्रध्देमुळे अनेक गरीब असहाय्य लोकांची फसवणूक होत असते अशा लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अमंलबजावणी समितीचे गठन करण्याबाबत सामाजिक न्याय विभागाने कार्यवाही करावी. गृह विभागाने आलेल्या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करावी. प्रा.श्याम मानव यांनी केलेल्या सूचनांबाबत शासन सकारात्मक असून राज्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्व निर्णय घेण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
अंधश्रद्धेमुळे आजही अनेक गरीब, असहाय्य लोकांची फसवणूक होत असते. त्यामुळे #जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीने कामकाजाला गती देऊन राज्यात जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी,असे निर्देश उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी याबाबतच्या बैठकीत दिले pic.twitter.com/Rwl8eMUB7P
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 7, 2021
जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीचे पुनर्गठन करण्यात येईल. तसेच या कायद्याची माहिती तसेच जनजागृती करणे, जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार समितीचे सहअध्यक्ष प्रा.श्याम मानव यांच्याशी चर्चा करून त्यांनी विभागासंदर्भात मांडलेल्या मुद्यांबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली. या कायद्याच्या प्रचारामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारा, मानवता जोपसणारा, समता -बंधुता-स्वातंत्र्य या मुल्यांना स्वीकारणारा समाज निर्माण होण्यास मदत होईल असेही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी प्रभावीपणे काम करावं.आजही अंधश्रध्देमुळे अनेक असहाय्य गरिबांची फसवणूक होते.अशा लोकांत जनजागृती गरजेची आहे. जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अमंलबजावणी समितीचे गठन करण्याबाबत सामाजिक न्याय विभागानं कार्यवाही करावी.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 7, 2021
जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीची पुर्नगठन, या समितीने पहिल्या टप्प्यात केलेली कामे, समितीच्या कामकाजासाठी शासनाकडून वित्त, गृह, महसूल, सामाजिक न्याय विभाग,विधी व न्याय विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या जबाबदाऱ्या या संदर्भात सविस्तर सूचना बैठकीत केल्या.
इतर बातम्या :