अजितदादा म्हणाले, त्या दिवशी माझी आई देवघरात जाऊन पांडुरंगा विठ्ठला नाम जप करत बसली

| Updated on: Dec 22, 2024 | 7:08 PM

Ajit Pawar In Baramati: शेतकरी वर्गासाठी योजना आणल्या. वीज माफीमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. जनसन्मान यात्रा निमित्त महाराष्ट्र राज्यात फिरत असताना कुणावरही टीका करायची नाही आम्ही ठरवले होते. महायुतीने आणलेल्या योजना लोकांपर्यंत पोहचवायच्या अशी रणनीती आम्ही ठरवली होती.

अजितदादा म्हणाले, त्या दिवशी माझी आई देवघरात जाऊन पांडुरंगा विठ्ठला नाम जप करत बसली
अजित पवार
Follow us on

Ajit Pawar In Baramati: लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये आम्ही पिछाडीवर होतो. त्यानंतर बारामतीमध्ये जाऊन आम्ही जनतेपर्यंत आमच्या सरकारचे काम नेले. त्यामुळे मला बारामतीमध्ये विजयाची खात्री होती. परंतु विधानसभा निवडणुकीच्या दिवशी काही चॅनेलने पोस्टल मतांनी मी मला मागे दाखवले. मग त्यावेळे माझी थेट देवघरात गेली. ती त्या ठिकाणी पांडुरंगा विठ्ठला नाम जप करत बसली. माझी बहीण विजया अक्का आईला सांगत होती आम्ही बारामतीत फिरलो आहे नक्की दादा निवडून येईल. परंतु आई देवासमोरच बसली होती, अशी आठवण अजित पवार यांनी रविवारी बारामतीमध्ये सांगितली.

लोकसभेच्या निवडणुकीत ३८२ बुथवर आपण मागे होतो. आता विधानसभा निवडणुकीत ३८२ बुथवर आपण पुढे आलो. बारामतीकरांनी भरघोस मतांनी आपणास निवडून दिले. धो, धो मतांनी मला निवडून दिले. तुमच्यापुढे नतमस्तक होतो, असे भावनिक वक्तव्य अजित पवार यांनी केले.

आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही…

मंत्रिमंडळाचे खाते वाटप झाल्यानंतर पहिल्यांदा अजित पवार बारामतीमध्ये आले. त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीने कशी रणनीती तयार केली, त्याची माहिती दिले. अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आले. आम्ही त्यावेळी ईव्हीएमला दोष दिला नाही. पराभवाची कारणे आम्ही शोधले. अधिक जोमाने कामाला लागले. लोकसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना आणली.

हे सुद्धा वाचा

शेतकरी वर्गासाठी योजना आणल्या. वीज माफीमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. जनसन्मान यात्रा निमित्त महाराष्ट्र राज्यात फिरत असताना कुणावरही टीका करायची नाही आम्ही ठरवले होते. महायुतीने आणलेल्या योजना लोकांपर्यंत पोहचवायच्या अशी रणनीती आम्ही ठरवली होती. खरंच सांगतो विधानसभा निवडणुकीत एकतर्फी कौल जनता देईल असे वाटले नव्हते, असे अजित पवार यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत भाजप स्ट्रॅइक रेट हा भाजप आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त आहे. आजपर्यंत राज्यात जेवढ्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यात एवढे मतदान झाले नाही, तेवढे आता महायुतीला झाले. आम्हाला चांदयापासून बांधापर्यंत सर्व लोकांनी मतदान केले.