राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरु आहे. अजित पवार यांची ही यात्रा शनिवारी कोकणातील रायगडमध्ये आली. त्यावेळी उत्साही कार्यकर्त्यांमुळे गंभीर घटना घडली. अजित पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी व्यासपीठावरच फटाक्यांची आतषबाजी केली. त्यावेळी व्यासपीठावर आग लागली. कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर अजित पवार यांच्या स्वागतासाठी फटके लावले होते. त्यातून ही घटना आग लागली. या आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैव चांगले होते, त्यात काहीच नुकसान झाले नाही.
अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सध्या राज्यात सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवार जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात जात आहे. यावेळी महायुती सरकारकडून करण्यात येणारी कामांची माहिती ते जाहीर सभांमधून जनतेला देत आहे. अजित पवार यांची ही जनसन्मान यात्रा आता कोकणात आली आहे. त्याचवेळी रायगडमध्ये आग लागल्याची घटना घडली.
अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज कोकणात रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि रत्नागिरीतील चिपळूण येथे आहे. यावेळी श्रीवर्धन येथे एक महिला मेळावा पार पडणार आहे. त्यावेळी अजित पवार पर्यटन आणि हॉटेल व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात हरिहरेश्वर मंदिरातून अभिषेक झाल्यावर सोमजादेवी मंदिरात ही अजित पवार दर्शनाला जाणार आहेत.
वाशिम शहराच्या रिसोड नाका परिसरात असलेल्या एका देशी दारूच्या दुकानातील वॉटर कुलरच्या एसीमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किट होताच आगीने रौद्ररूप धारण केले. मात्र, आगीवर काही वेळातच नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना घडली. दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते.