मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणामध्ये वर्षभरात सलग दुसरा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं आहे. आपल्या समर्थक आमदारांना घेऊन अजित पवार सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर दावाही सांगितला आहे. तसेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांची उचलबांगडीही केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या बांधणीला सुरुवात केली आहे.
अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गटाच्या जोरबैठका सुरू असून पुढील रणनीती ठरवली जात आहे. तर दुसरीकडे इतर राजकीय पक्षांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
दीपक केसरकर यांच्या बंगल्यावर शिवसेना शिंदे गटाची बैठक होणार आहेत. राज्यातील घडामोडीवर ही बैठक महत्वाची असणार आहे. या बैठकीसाठी दादा भुसे, संजय राठोड आणि आनंदराव अडसूळ दाखल झाले आहेत.
घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं माहिती नाही. छगन भुजबळ, प्रफुल पटेल दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांसोबत जाण्यासारखे नाहीत मला जरा हे संशयास्पद वाटत आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
राज्याच्या राजकीय घडामोडीमुळे राज ठाकरे उद्विग्न, सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राची देशभर बदनामी होत आहे. पक्ष येतील जातील, तुम्ही आम्ही येणार, जाणार मात्र महाराष्ट्र टिकला पाहिजे. महाराष्ट्र टिकवण्याससाठी मनसैनिकांनी तळागाळपर्यंत पोहचलं पाहिजे. राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांशी
चर्चा
राष्ट्रवादीत पडलेल्या दोन गटांमुळे आता कार्यकर्ते पदाधिकाऱ्यावरुन खेचाखेची सुरू आहे. शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा सांगली जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांनी घेतला आहे निर्णय. मात्र यातीलच काही नेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून उद्याच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे निरोप आले आहेत. मात्र शरद पवार यांच्या गटाच्या बैठकीस जाण्याचा अनेक नेत्यांचा निर्धार
जे झालय ते अत्यंत किळसवानं झालेलं आहे. जनमताचा कौल तुम्ही घेतला तर प्रत्येक घरामध्ये शिव्या ऐकायला येतील दुसरे काही ऐकायला येणार नाही. कुणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात गेल्यात काही कळत नाही. सुरुवात शरद पवार यांनी केली 78 साली शेवट त्यांच्यावरच होतो आहे. परवाच्या दिवशी अजित पवार यांनी स्टेटमेंट केलं होतं शरद पवार यांचे होर्डिंग वर फोटो लावा हे अनाकलनीय आहे. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही असं मी म्हटलेलं आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ऍफिडेवीट करून घेण्यात येत आहे. यात शरद पवार यांनाच पाठींबा असणार आहे आणि आम्ही याच पक्षासाठी काम करत असल्याचे मजकूर अजून हे ऍफिडेवीट नोटरी देखील करण्यात येत आहे. आजपासून पक्ष कार्यालय येथे हे फॉर्म भरून ऍफिडेवीट करण्यास सांगितले आहे.
अजित पवारांनी केलेल्या बंडामागे शरद पवारच असल्याची शक्यता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे मंत्री पदासाठी अजित पवारांसोबत जाणाऱ्यातले नाहीत त्यामुळे हे सगळं संशयास्पद असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात घडत असलेल्या प्रसंगावर मी मेळाव्यात बोलेल असे राज ठाकरे म्हाणाले. महाराष्ट्रात अशा प्रकारांची सूरूवात पवार साहेबांनीच केली आणि शेवटही त्यांच्यावरच होतोय असे राज ठाकरे म्हणाले.
देश पातळीवर पंतप्रधान मोदी शिवाय पर्याय नाही असे म्हणत अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचे कौतूक केले आहे. विकासाच्या दृष्टीकोणामुळे आम्ही भाजप सरकारसोबत असल्याचे अजित पवार म्हणाले. विरोधक विस्कळीत झालेले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देश आगेकुच करतोय असेही अजित पवार म्हणाले.
खाते वाटपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अर्थ, जलसंपदा, सामाजिक बांधकाम खातं राष्ट्रवादीला देऊ नका अशी आग्रहाची मागणी शिंदे गटाच्या आमदारांची आहे.
अजित पवारांना अर्थ खाते मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. याशिवाय अनेक महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या विषयी चर्चा करण्याठी संध्याकाळी रामटेक निवास्थानी बैठक घेण्यात येणार आहे. दिलीप वळसे पाटील यांना कृषी खाते मिळण्याची शक्यता आहे.
अजित पवारांकडे अर्थ खाते देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अजितदादांकडे हे खाते देण्यात येऊ नये यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याचे समजते. महाविकास आघाडीच्या काळातही अजित पवारांकडे अर्थखातेच होते हे विशेष. अजित पवारांकडून निधी मिळत नसल्याने शिंदे गट महाविकास आघाडीतून वेगळा झाला होता.
अजित पवारांनी सत्तेच्या पारड्यात उडी घेतल्यानंतर त्यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी सोपवली जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपवल्या जाण्याची शक्यता आहे. खाते वाटपाचा तिढा सुटल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रवादीचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे हे शरद पवार यांच्या सोबत आहेत. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी हे शरद पवार यांच्या सोबत आहेत. तर जिल्ह्यातील 150 च्यावर पदाधिकारी सुद्धा सोबत आहेत त्यामधे तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्षसह इतर आहेत. जिल्ह्यातील 9 जिल्हा परिषद सदस्य सुद्धा शरद पवार यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी यांची माहिती.
मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेतल्या जाणार आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे , सुषमा अंधारे, भास्कर जाधव आणि अंबादास दानवे यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतले जाणार आहे. 20 जुलै नंतर सभेची सुरुवात होणार आहे त्यासाठी लवकरच तारीखा जाहीर होणार आहे. ठाकरे गटाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती.
काही प्रमाणात नाराजी असते पण त्याचा अर्थ आम्ही नाराज आहोत असा मुळीच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्यानं आमची ताकद वाढणार आहे. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री का केलं नाही. अजित पवारांना कोणतंही खातं दिलं तरी आमचा विरोध असण्याचं कारण नाही. आमचा मंत्रीमंडळ दोन तीन दिवसांत होईल हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आमचा त्यावेळी विरोध होता की राष्ट्रवादी त्या़चा पक्ष मजबूत करत आहे. पण अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा कॉम्प्रोमाईज करावं लागतं, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया.
नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 2 गट आमने- सामने. राष्ट्रवादीच्या कार्यालयावरून वाद. कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ते आक्रमक.
कारंजा,रिसोड,मंगरुळपिर तालुक्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू. या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील रखडलेल्या पेरण्याला सुरवात होणार आहे. तसेच काही ठिकाणी पेरणी पिकांना मिळणार जीवनदान. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 2 गट आमने- सामने. राष्ट्रवादीच्या कार्यालयावरून वाद. कार्यालय कोण ताब्यात घेणार यावरून 2 गट आमने- सामने. कार्यालयावरून 2 गटात राडा. NCP कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा राडा.
जिथे जिथे आपण कमी आहोत त्या जागा आपण भरल्या पाहिजेत. जास्तीत जास्त जनतेत जाऊन जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार अपयशी ठरलेले आहे हे गद्दारांच सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातले आहे स्वतःची खळगी भरणारे हे सरकार आहे. त्यामुळे यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही दौरा करणार आहोत. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे व शिवसेनेचे सर्व नेते असणार आहेत ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचे वक्तव्य.
अजित पवारांच्या सत्तेतील सहभागावरून शरद कोळी यांनी शिवसेनेच्या शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी एकला चलो रे ची भूमिका घेतल्यास ती शिवसैनिकांना मान्य असेल. शिवसेनेशी गद्दारी करून सत्तेत सामील झालेल्या शिंदे गटाला कर्माची फळं मिळालीत. पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीनंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार, नितीश कुमार, लालूप्रसाद यादव यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. फोडा आणि राज्य करा ही नीती भाजप अवलंबतेय. मात्र 2024 साली महाराष्ट्रातील आणि भारतातील जनता भाजपला फोडल्याशिवाय राहणार नाही, असे कोळी म्हणाले.
तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरीता इंदापूर तालुका अजित पवारांसोबत आहे. भविष्यात अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येतील, असा दावा तालुका अध्यक्ष कोकाटे यांनी केला आहे. आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याशी चर्चा करून निर्णय, असेही कोकाटे म्हणाले.
शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी कार्यालयावर दाखल झाले आहेत. शरद पवार गटाचे पदाधिकारी बैठक घेण्यावर ठाम आहेत. मात्र बैठकीसाठी राष्ट्रवादी कार्यालयात येऊ देणार नाही, असा अजित दादा-भुजबळ गटाने इशारा दिला आहे. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथक देखील राष्ट्रवादी कार्यालय बाहेर तैनात करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत निर्देश दिले आहेत. मात्र त्याची वाजवी वेळ किती? हा आता वादाचा मुद्दा बनू शकतो, असं मत जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे. तसेच निर्णय घेण्याबाबतचा वेळ फार लांबवता येत नाही, सर्वोच्च न्यायालय ही बाब तपासू शकते. त्यानंतरच वाजवी वेळेच्या बाबतीत हस्तक्षेप करायचं का नाही? हे सर्वोच्च न्यायालय सांगू शकते. पण त्याबाबतचा आदेश या क्षणी तरी सर्वोच्च न्यायालय देऊ शकत नाही, असे मत देखील उज्वल निकम यांनी व्यक्त केले. ते सांगलीमध्ये बोलत होते.
तुम्हाला आश्वासित करतो की, आजची कॅबिनेट ही ऐतिहासिक झाली. तीन वेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी यात आपली भूमिका मांडली. बरेच लोकहिताचे निर्णय घेतले गेलेत, याचा फायदा जनतेला होईल. पोर्टफोलिओ बदलणार आहेत. याबाबत सीएम डीसीएम निर्णय घेतील. माझ्या खात्याबाबत जो कही निर्णय होईल तो मला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मला वाटतंय की जनतेलाच काय पण आम्हालाही हे परिवर्तन एक धक्काच होता. ज्या एनसीपीवर टीका केली, तिच्यासोबत आल्याने आता जनतेला हे पटवून देणं आणि त्यांनी स्विकारणं हे फोर मोठं आव्हान आहे, याला वेळ लागेल. नाराजी होण्याचं फार काही कारण नाही, तिघेही नेते मोठे नेते आहेत, ते निर्णय घेतील आणि आम्ही त्याचं पालन करू. अजित पवार यांच्या निधी वाटपावरून थोडीशी नाराजी होती, पण ती दूर होईल असं आश्वासन मिळालंय. त्यामुळे भविष्यात मोठे बदल पहायाला मिळतील. भाकरी करपायच्या आधीच आम्ही भाकरी पालटून टाकू, दुसरी भाकरी करू, असे बच्चू कडू यांनी म्हटलं.
कॅबिनेट बैठकिला उपस्थित राहून एक वेगळा अनुभव आला. ग्रामीण भागातील एका सर्वसाधारण आमदाराला संधी दिली, याचं समाधान आहे. संजय राऊत यांना काही काम राहिलं नाही, त्यांच्या बोलण्यालाही आता काही महत्व नाही. आम्ही सरकारमध्ये आता सामिल झालोय. मोदींचं तत्व मान्य केलंय. त्यामुळे पुढे कुणामध्ये नाराजी होण्याचं कारण नाही. हळू हळू हा बदल महाराष्ट्र स्विकारेल, आम्हीही याबाबत प्रयत्नशील राहू, कामातून उत्तर देऊ. सगळे आमदार आमच्याच बाजूने आहेत. आमच्याकडे आकडा आहे, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी आकडा घोषित करावा. टीका करण्याखेरीज विरोधकांना काम नाही. कायदेशीर लढाई आम्ही लढण्यास तयार, पण त्याची वेळ येईल असं वाटत नाही, अशी अनिल पाटील यांनी दिली.
पुणे शहरातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शरद पवारांसोबत राहणार असल्याचा ठराव बैठकीत करण्यात आला आहे. आजच्या बैठकीला दोन्ही आमदार आणि काही नगरसेवक उपस्थित नव्हते, मात्र उद्याच्या बैठकीला उपस्थित राहतील. कार्यालयाचा ताबा कुणी घेतला तर आम्ही कायदेशीर लढाई लढणार, कार्यालयाचे अॅग्रिमेंट माझ्या वैयक्तिक नावावर आहे. अजित पवारांचा अद्याप मला फोन नाही, मात्र मी त्यांना मेसेज करून शरद पवारांसोबत गेलो आहे. आजच्या बैठकीत प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आली आहे, असे राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
अनुभवी मंत्र्यांची जोड लाभली आहे. तीन पक्ष एकत्र येऊन विकासासाठी काम आम्ही करू. देशात एक नंबरच राज्य आपलं बनेल. जे आमच्यात आलेत, त्यांना घाई नाही. खातेवाटप लवकर होईल, सखोल चर्चा होईल. शरद पवार आमदारांना संपर्क करत असतील. प्रत्येक गुगलीत नेहमी समोरचा आउट होतो असं नाही. तुम्हाला हे भोवलं आहे. राष्ट्रवादी आता आमच्यासोबत आहे. शरद पवार आधी म्हणाले. आम्ही कोर्टात जाणार नाही. आता जाणार आहेत. कोर्टात कशाला जाताय? आमदार असतील तर राजभवनात जा. सर्व आमदार समोर आणा. तेव्हा संख्या जमली नसेल. आमदारांना तेव्हा सुद्धा मोदींच्या नेतृत्वात काम करायचं असेल, असे मुनगंटीवार म्हणाले.
आपसातील वादातून राज्य राखीव पोलीस दलातील एका जवानाने दुसऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. सुरेश मोतीलाल राठोड असे मयत जवानाचे नाव आहे. मारुती सातपुते असे आरोपी जवानाचे नाव आहे. काल रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये मोठं भांडण झालं होतं. या भांडणातून सातपुते याने राठोडवर चाकूने हल्ला केला. जखमी अवस्थेत राठोडला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
बारामती तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उद्या अजित पवारांच्या बैठकीला जाणार आहेत. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सर्व संस्थांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या.
एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यासह कार्यकर्ते नव्या राज्य सरकारचं फटाके फोडून स्वागत करणार आहे. फटाके फोडत ढोल ताशे वाजवत एमआयएम जल्लोष करणार आहे. एमआयएम उपहासात्मक आंदोलन करत जल्लोष करणार.
सध्या एकला चलो बाबत कोणताही विचार, कोणतीही चर्चा, पुसटसा सुद्धा उल्लेख या ठिकाणी कोणी केलेला नाही. भारतीय जनता पार्टीकडून आमच्यामध्ये फूट पाडण्याकरता, आमच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण होण्याकरता आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याकरता अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहे. परंतु भारतीय जनता पार्टीवर आता कोणताही विश्वास राहिलेला नाही, असे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.
उद्धव साहेबांनी दौरा करावा अशा प्रकारचा आम्ही आग्रह करण्यापेक्षा उद्धव साहेब गेले अनेक महिने मला महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे, असं सातत्याने सांगतात. परंतु मध्यंतरी पाऊसच नव्हता. आता पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे. त्यामुळे उद्धव साहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर लवकरच बाहेर पडतील असा मला वाटतं, असे भास्कर जाधव म्हणाले.
बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. खातेवाटपाबाबत मतमतांतरे असू शकतात. शिंदेंसोबत अडीच वर्ष काम केलं. विकासाच्या मुद्द्यावरुन सरकारला पाठिंबा दिला. विकासासाठी शिंदे आणि भाजपसोबत एकत्र आलो, असेही अजित पवार पुढे म्हणाले.
ठाकरे गट महाविकास आघाडीत राहूनच एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत एकत्रित निवडणूक लढण्यावर चर्चा झाली.
उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर उपस्थितीत बैठक झाली , त्यात हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आगामी निवडणुकांसाठी कसून तयारी करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मातोश्रीवरील बैठकीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकला चलो रे सूर उमटला आहे. निवडणुकांसाठी तयार रहावे, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
पक्ष संघटना आणखी मजबूत करा, असे आदेशही उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
मंत्रीमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्वाची बैठक सुरू झाली आहे. मुख्यमंत्री कार्यालयात ही बैठक सुरू आहे.
संभाव्य खातेवाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबतही होऊ शकते चर्चा.
अजित पवार यांच्या गटाच्या मुंबईतील कार्यालयाचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे. मंत्रालयसमोर हे नवे कार्यालय असेल.
कार्यालयाच्या उद्घाटनासाठी छगन भुजबळ, सुनील तटकरे, अदिती तटकरे, रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते तसेच कार्यकर्ते उपस्थित आहेत.
शरद पवार यांच्याकडे आमदार राहिलेले नाहीत. राष्ट्रवाादीची सध्या स्थिती ‘शोले’ सारखी आहे, आधे इधर, आधे उधर…. अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
आमदार असतील तर ते समोर आणावेत, असे आव्हानही त्यांनी दिले.
शरद पवार हेच राष्ट्रवादीचे प्रमुख राहतील असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. संकटात एकत्र लढण्यासाठी पवारांच्या भेटीला आलोय.. असं वक्तव्य देखील पटोले यांनी केलं आहे. विरोधी पक्षनेत्याबाबत अद्याप चर्चा नाही.. असं देखील पटोले म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. गुलाबरावांच्या विरोधात लढायचं आहे, मी शरद पवारांसोबत असल्याची देवकरांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आज राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक जळगावमध्ये पार पडली आहे..
काल रात्री आजच्या बैठकीचे उशिरा निरोप गेल्यामुळे काही जण हजर नाहीत.. असं वक्तव्य प्रदीप गारटकर यांनी केलं आहे. ‘जिल्हा राष्ट्रवादी म्हणून आम्ही एकत्र आहोत. ४ ते ५ तालुका अध्यक्ष जे आज उपस्थितीत नाहीत त्यांच्याशी चर्चा केली जाईल. राज्यात अनपेक्षित घटना घडल्या आहेत. जिल्यातील इतर तालुक्यातील अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून रात्री निर्णय घेऊ…’ असं देखील प्रदीप गारटकर म्हणाले.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नक्की कोणाला पाठिंबा द्यायचा… या संभ्रमात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आहे. नेमका कुणाला पाठींबा द्यायचा याबाबत बैठकीत निर्णय झालेला नाही. ग्रामीण भागातील राष्ट्रवादी नेमकी कुणाची याबाबत स्पष्टता नाहीच. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी माहिती दिली आहे.
उद्याच्या बैठकीत पवारांना किती पाठिंबा आहे हे कळेल.. असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. अजित पवार गटाकडून लोकांना संभ्रमीत करण्याचा प्रयत्न होत आहे. अजित पवार यांची नोशनलिस्ट पार्टी आहे. नोशनलिस्ट पार्टी मला निलंबित करु शकत नाही अशी भूमिका देखील जयंत पाटील यांनी स्पष्ट केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण यवतमाळ जिल्ह्यातील नाईक घराणे अजित दादा यांच्यासोबत आहेत. आमदार इंद्रनील नाईक हे अजित पवार यांच्यासोबत राहणार आहेत. पुसदमध्ये आयोजित सहविचार सभेत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या राजकारणमध्ये नाईक परिवाराचे मोठे महत्व आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून नाईक परिवार पक्षामध्ये आहेत.
ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंची सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या निलंबनाचा निर्णय लवकर व्हावा.. अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली आहे.
दिपील वळसे पाटील यांना सांस्कृतिक खातं मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर हसन मुश्रीफांना कामगार मंत्रीपद मिळाणार असल्याची माहिती समोर येत आहे. शपथविधीनंतर अजित पवार यांची पहिली बैठक आहे.
अजित पवार – महसूल
दिलीप वळसे पाटील – सांस्कृतिक आणि कृषी
छगन भुजबळ – ओबीसी आणि बहुजन विकास
हसन मुश्रीफ – अल्पसंख्याक आणि कामगार
धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
धर्मराव बाबा- आदिवासी कल्याण
आदिती तटकरे – महिला आणि बालविकास
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता अजित पवार यांच्या सोबत जाणार नाही, आम्ही सगळे शरद पवार यांच्या सोबत राहणार आहोत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी दिली आहे. उद्या मुंबई येथे शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि धर्मराव बाबा आत्राम यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन केल्याची वैद्य यांनी माहिती दिली. सर्व १५ तालुक्यांचे अध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व आघाडी प्रमुख अशी जवळपास ७० प्रमुख पदाधिकारी मुंबईत दाखल होणार आहेत.
अजित पवारांनी फसवून आमदारांना सोबत नेलं आहे असा टोला रोहित पवारांनी अजित पवार यांच्या गटाला लावला आहे. राज्यात पुन्हा परिवर्तन अटळ आहे. शरद पवारांचं व्हिजन नसेल तर पक्षाचं चिन्ह असून काय उपयोग असंही रोहित पवार म्हणाले.
मागच्या १ तासांपासून राष्ट्रवादीच्या सर्व तालुका अध्यक्षांची बैठक सुरू आहे. बैठकीला जिल्हयातील जवळपास सर्वच तालुक्याचे तालुकाध्यक्ष उपस्थित आहेत. पुणे जिल्हयातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेमका कुणाला पाठींबा देणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे बैठकी नंतर जिल्हाअध्यक्ष प्रदिप गारटकर पत्रकार परिषद घेणार आहेत.
दलित आणि मुस्लिमांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबाद मोर्च्याला सुरवात झाली आहे. भडकल गेट ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
अजित पवारांच्या शपथविधीनंतर पुणे राष्ट्रवादीत घडामोडीना वेग
शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी बोलावली तातडीची शहर कार्यकारीणीची बैठक
शरद पवारांसोबत रहायचं का अजित पवारांसोबत याबाबत बैठकीत होणार निर्णय,
बैठकीला शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित
मातोश्रीवरील बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार, खासदार आणि इतर पदाधिकारी पोहचत आहेत.
सुरज चव्हाण, राजन साळवी, अनंत गीते, अरविंद सावंत, सचिन अहिर, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, राहूल पाटील, नरेंद्र दराडे मातोश्रीवर दाखल
मातोश्रीवरील बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष
आमदार सुनील शेळके यांचा गौप्यस्फोट, सुप्रिया सुळेंच्या उपस्थित सत्तेत जाण्याच ठरलं
सत्तेत जायचं हे शरद पवार यांना विचारावं अस आम्हाला वाटत नव्हतं.
त्या ठिकाणी ‘सुप्रिया सुळे’ होत्या, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे, छगन भुजबळ होते. ह्या नेत्यांनी सत्तेत जायचा निर्णय घेतला.
अजित पवार यांनी आम्हाला बोलवून घेतलं, त्यांनी सत्तेत जाण्याबाबत स्पष्ट सांगितलं होतं. आम्ही सत्तेत राहायचं म्हणून सह्या दिल्या आहे.
अचानक शपथविधीचा कार्यक्रम झाला. सत्तेत घटकपक्ष म्हणून राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादीत गट तट नाही. राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादी परिवारासोबत मी असेल.
पुढील मंत्रीमंडळ विस्तारात माझा नंबर नक्की लागेल.
राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतर भरत गोगावले यांची पहिली प्रतिक्रिया
सध्या वस्तूस्थिती स्विकारण्याची गरज आहे.
अजित पवारांना आम्हाला न्याय द्यावा लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वे शरद पवार वायबी चव्हाण सेंटरकडे रवाना झाले आहे. या ठिकाणी होणाऱ्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे.
मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणती खाती जाणार याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यात अजित पवार यांना महसूल खाते दिले जाणार आहे. दिलीप वळसे यांना सांस्कृतिक तर छगन भुजबळ यांना ओबीसी खाती देणार असल्याचे वृत्त आहे. हसन मुश्रीफ यांना कामगार खाते मिळणार असल्याचे वृत्त आहे.
शिवसेना ठाकरे गटाची बैठक मातोश्रीवर मंगळवारी दुपारी 12.30 ही बैठक सुरू होणार आहे. या बैठकीत आमदार, खासदार, नेते, उपनेते उपस्थित राहणार आहे. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर शिवसेना ठाकरे गटाची ही पहिली बैठक होणार आहे.
अमित शहा आणि नरेंद्र मोदी सांगतील हे त्यांना ऐकावे लागणार आहे. एकतर सत्तेत या किंवा जेलमध्ये जा, हा पर्यात त्यांच्यांकडे होता, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
सर्व आमदारांना विश्वासात घेऊन अजित पवार यांनी हे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी अजित पवार व प्रफुल्ल पटेल सत्तेत सामील झाले, असे तुमसर – मोहोडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी अजित पवार यांच्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर मंत्रीसुद्धा दाखल झाले आहे. दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या खात्यासंदर्भात चर्चा होणार आहे.
राज्यातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसची आज बैठक होत आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाल्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवस्थानी मंत्र्याची बैठक सुरु आहे. कॅबिनेटची बैठक होण्यापूर्वी ही बैठक सुरु आहे. त्यात गुलाबराव पाटील, संजय गायकवाड, संदीपमान भुमरेसह काही आमदार वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहे. बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची ही शक्यता वर्तवली आहे.
शरद पवार यांच्या बंगल्यावर मंगळवारी हालचालींना वेग आला आहे. त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरु आहे. जयंत पाटील, रोहित पवार शरद पवार यांच्या निवासस्थानी आले आहेत. अजून अनेक नेते या ठिकाणी येणार आहेत.
अजित पवार यांच्या बंगल्यावर मंगळवारी हालचालींना वेग आला आहे. सकाळपासून त्यांच्या बंगल्यावर बैठकींचे सत्र सुरु आहे. सकाळी ११ वाजता अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना झाले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ही पहिलीच बैठक होत आहे.
नाशिकमध्ये अजित पवार – छगन भुजबळ गटाने राष्ट्रवादीच्या कार्यालयावर ताबा घेतला आहे. राष्ट्रवादी कार्यालयात कोणालाही घुसू देणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस दिलीप खैरे, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास खैरे या कार्यलयात उपस्थित आहेत. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय.
राष्ट्रवादीमधील फुटीनंतर कोल्हापुरात बॅनरबाजी पाहायला मिळतेय. गोकुळ दूध संघांचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी शहरात बॅनर लावत केलं आमदार हसन मुश्रीफ यांचं अभिनंदन केलं आहे. बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे फोटो आहेत. शरद पवार यांचा फोटो मात्र बॅनरवरून गायब झालेला आहे. रात्रीत बॅनर झळकावत अरुण डोंगळे यांनी आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचा संदेश दिला आहे. राज्यातील सत्ता बदलाचा गोकुळ दूध संघाच्या सत्तेवर परिणाम होणार का? या चर्चांना आता उधाण आलं आहे.
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप लावला आहे. भाजप हा राजकारणातील सिरियल किलर आहे. सिरियल रेपिस्टस आहे, असे गंभीर आरोप राऊतांनी केले आहेत. भाजपने शिंदेगटाला पक्ष आणि चिन्हावर दावा करायला लावला. तसंच राष्ट्रावादीतून फुटलेल्या लोकांनाही भाजपने करायला लावलं आहे, असंही ते म्हणालेत.
अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळे भाजपमधील नेते नाराज असल्याची माहिती आहे. इंदापूरचे भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेल्यामुळे हर्षवर्धन पाटलांची पंचाईत झाल्याची चर्चा सध्या होते आहे. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. जिल्हा बँक आणि जिल्ह्यातील सहकारात हे दोन्ही नेते कायमच एकमेकांच्या विरोधात राहिले आहेत. पण आता अजित पवार भाजपसोबत आल्याने हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची माहिती आहे.
अजित पवार यांना कंटाळून भाजपसोबत आलो, असं म्हणणारा मिंधेगट शपथविधीवेळी अजित पवारांसमोर लोटांगण घालत होता. शिंदे गट भाजपचा गुलाम आहे आणि गुलामांच्या नाराजीला काहीही किमंत नसते. तशी एकनाथ शिंदे यांच्या गटातील लोकांच्या नाराजीला कुणीही विचारत नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापुरमध्येही पदाधिकाऱ्यांमध्ये उभी फुट पडली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील अजित पवारांसोबत आहेत. तर शहर अध्यक्ष आर.के. पोवार शरद पवार यांच्यासोबत राहणार आहेत. माजी आमदार के. पी. पाटील यांनी आज प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. बिद्री सहकारी साखर कारखान्यावर दुपारी बारा वाजता ही बैठक होणार आहे. कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर माजी आमदार के.पी पाटील कुणासोबत जायचं याचा निर्णय घेणार आहेत.
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. कुणी अजित पवार गटात आहे तर कुणी शरद पवार यांच्या गटात आहे, अशी माहिती कार्यकर्ते आणि नेते देत आहेत. पण सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांबवे गावात एक वेगळी घटना पाहायला मिळाली. बैलप्रेमी यांनी बेंदूर सणाचं औचित्य साधून बैलाच्या अंगावर “आम्ही साहेबाच्या सोबत”, असं लिहिलं आहे. या अनोखी कलाकृतीची, या मजकुराची आणि या बैलाची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील अर्धी राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासोबत आहेत. औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील अजित पवार गटात दाखल झाले आहेत. जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी अजित पवार गटात सामील झाले आहेत. तर शहराध्यक्ष खाजा शेख , माजी आमदार संजय वाकचौरे आणि इतर पदाधिकारी शरद पवार यांच्यासोबत आहेत. दरम्यान, तटस्थ पदाधिकाऱ्यांना दोन्ही गटाकडून फोन सुरू आहे.
रोहित पवार यांनी राष्ट्रवादीतील घडामोडींवर आणि बंडावर ट्विट केले आहे. अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे विचार ट्विट करत त्यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. ‘जर तुम्ही एकदा जनतेचा विश्वास तोडला तर तुम्हाला परत कधी जनतेचा आदर आणि सम्मान मिळणार नाही’ हे अब्राहम लिंकन यांचे विचार शेअर करत त्यांनी सध्याच्या बंडावर निशाणा साधला.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 4, 2023
रविवारी दुपारपासून राज्यातील राजकारणाने पूर्ण 360 अंशांची कलाटणी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उलथापालथ होत असली तरी सत्तेच्या केंद्रभागी त्याचे हादरे बसायला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी शिंदे गट नवीन अपडेटमुळे अस्वस्थ असल्याचे समोर येत आहे. तर डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान आज सकाळापासून अनेक खलबतं सुरु आहेत. नरहरी झिरवळ सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. तर जयंत पाटील शरद पवार यांच्या भेटीला पोहचले आहेत. सिल्व्हर ओक येथे जयंत पाटील दाखल झाले आहेत.
आमदार आपल्या खेम्यात ओढण्यासाठी आता रस्सीखेच सुरु आहे. आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्यासोबत असणारे प्राजक्त तनपुरे हे अजितदादा पवार यांच्या सोबत जाण्याची शक्यता आहे. कोण पॉवरफुल आहे, हे या रस्सीखेचमधून समोर येईल.
राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे हे खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. कोल्हे आजच शरद पवार यांच्याकडे त्यांचा राजीनामा सोपविणार आहेत. रविवारपासून राष्ट्रवादीत नाट्यमय घटना घडत आहेत. अजित पवार यांच्या शपथविधी वेळी डॉ. कोल्हे हे उपस्थित होते. पण त्यांनी आता खादारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत आज अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचं उद्धघाटन होणार आहे. अजित पवार यांच्या हस्ते नव्या कार्यालयाचं उद्धघाटन होणार आहे. मंत्रालयासमोरचं हे कार्यालय असेल. या कार्यालयातून राष्ट्रवादीचा गाडा हाकण्यात येणार आहे.
राज्याची आर्थिक नाड्या असणारे अर्थखाते अजित पवार यांच्याकडे जाऊ नये, असा सूर शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांनी आवळला आहे. अर्थखाते पवार यांच्याकडे गेल्यास निधी मिळणार अशी भीती शिंदे गटाला वाटत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थखाते पवार यांच्याकडे जाण्याच्या चर्चेमुळे शिंदे गट अस्वस्थ झाला आहे. निधी रोखून अजित पवार करिअर संपवतील, अशी भीती त्यांना वाटत आहे.
आगामी निवडणुकांबाबत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक येत्या 7 जुलै रोजी होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला देशातील सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी उपस्थित राहणार आहेत.
महत्त्वाची खाती राष्ट्रवादी आणि भाजपकडे गेल्याने शिंदे गटाचे नेते नाराज आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांकडेही त्यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांच्या निधी वाटपाच्या फॉर्मुल्याला वैतागून शिंदेंची साथ देणारे नेते लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यात अर्थ मंत्रालय अजित पवारांकडे जाणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळाल्यानंतर शिंदे गटातील नेते अस्वस्थ झाले आहेत. शिंदे आणि फडणवीस याबाबात तोडगा काढणार असल्याचं कळतंय. दोन्ही नेत्यांमध्ये यावर दोन तास चर्चा झाली.
अजित पवारांकडून राज्यातील सगळ्या जिल्हाध्यक्षांना संपर्क करायला सुरुवात झाली आहे. माझ्यासोबत येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. अनेक जिल्ह्यात बैठका घेऊन अध्यक्ष निर्णय कळवणार आहेत. मात्र 5 तारखेच्या बैठकीसाठी अजित पवारांकडून हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. अजित पवारही स्वतःच्या संघटना मजबुतीसाठी मैदानात उतरले आहेत.
राज्यातील सत्ता नाट्यानंतर कोल्हापूर भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. दोन दिवसांपासून समरजीत घाटगे संपर्काबाहेर आहेत. घाटगे समर्थकांचं मात्र सोशल मीडियावर जोरदार कॅम्पेनिंग सुरू आहे. आम्ही राजेंसोबत, राजे ठरवतील तो पक्ष, ठरवतील ते धोरण.. असं म्हणत समर्थकांनी घाटगे यांना पाठिंबा दर्शविला आहे. समरजित घाटगे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कट्टर विरोधक असलेल्या हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळाल्याने समरजित घाटगे आणि त्यांच्या समर्थकांची कोंडी झाली आहे.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नऊ आमदार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर आता बारामती शहरात जोरदार बॅनरबाजी पहायला मिळतेय. या बॅनर्सवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा चाणक्य म्हणून उल्लेख केला आहे. तर दुसरीकडे अजित पवारांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्सवर शरद पवारांचा फोटो गायब आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत.
राज्यात आज चार महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे. पहिली घडामोड म्हणजे आज दुपारी 12 वाजता नव्या कॅबिनेटची पहिली बैठक होणार आहे. त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यानंतर आज दुपारीच उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. काँग्रेसनेही आज एका बैठकीचं आयोजन केलं आहे. तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे काही विधीतज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नाशिकमध्ये येत्या 8 तारखेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. नाशिकच्या तपोवनमध्ये हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक आणि चित्रपट विभागाने पाठिंबा दिला आहे. या विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी आज सकाळीच 7 वाजता देवगिरीवर जाऊन अजित पवार यांची भेट घेत त्यांच्याशीच चर्चा केली. पक्षात प्रवेश केलेले कलाकार हे अजित दादांसोबत राहाणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवार यांच्याकडील आमदारांचं संख्याबळ घटलं आहे. तर अजित पवार यांचा एक गट सरकारमध्ये गेला आहे. त्यामुळे विरोधी पक्षात सर्वाधिक आमदार संख्या काँग्रेसकडेच उरली आहे. परिणामी राज्याचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसही विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे. या पदासाठी काँग्रेसमध्ये अनेकजण इच्छुक असून विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. पुणे शहरात पार पडणाऱ्या या बैठकीला जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी ही बैठक बोलावली आहे. अजित पवार यांना पाठिंबा द्यायचा की शरद पवार हे आजच्या बैठकीत ठरणार आहे. बैठकीला पुणे शहरातील पदाधिकारी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बैठकीत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती प्रदीप गारटकर यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची शपथपत्र घेणार आहे. पुढील काळात शपथपत्र लागण्याची चिन्ह आहेत. राज्यभरात उद्यापासून भरून घेतली जाणार अँफेडेव्हीट. वरिष्ठ स्तरावरून सूचना मिळाल्याचे देखील कळत आहे.
अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यामध्ये मोठ्या राजकिय घडामोडी घडताना दिसत आहेत. उद्या मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती मिळत आहे. दुपारी अजित पवारांच्या हस्ते मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या नव्या कार्यालयाचे होणार उद्घाटन अशी माहिती मिळत आहे.
अजित पवार यांच्या बंडावर उज्वल निकम यांनी मोठा भाष्य केले आहे. उज्वल निकम म्हणाले की, अजित दादांचे बंड की थंड याबाबत स्पीकर समोर कागदपत्रे आल्यावर भाष्य करू. अजित दादांच्या बंड आहे की थंड आहे की अधिकृत पक्षाची भूमिका हे स्पीकर समोर कागदपत्रे येत नाहीत तो पर्यंत मत प्रदर्शित करता येणार नाही.
जो महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये जो खेळ बघितला. तो नव्याने नवा अध्याय , नवा भिडू यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. याबाबत आता स्पिकरना अधिकार आहेत. स्पीकरनी विहित कालावधीत निर्णय घेतला पाहिजे. यामध्ये मात्र कागदोपत्री पुरावे याची छाननी करावी लागेल, अशी प्रतिक्रिया उज्वल निकम यांनी दिली.
एक गटाला बाहेर पडून स्वत:ला पक्ष म्हणण्याचा अधिकार नाही. तुमची संख्या कितीही असो पण तुम्हाला पक्ष म्हणून मान्यता देता येणार नाही- आव्हाड
सुभाष देसाई आणि राज्यपाल यांच्या पाच याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावेळी निकालात फक्त पार्टीचा अध्यक्ष प्रतोद नेमू शकतो असे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी म्हटले आहे. त्याच आधारे माझी निवड राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. शिवसेनेच्या निकालातही तसेच म्हटले आहे. त्यामळे माझी निवड योग्य आहे असे जितेंद्र एव्हडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
व्हीपचा अधिकार हा पक्षाला आहे. शरद पवार यांनी जयंत पाटील यांची नियुक्ती केलेली तुम्ही रद्द कशी करू शकता? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. करण त्यांना संविधानिक नियुक्त्या करण्याचा परवानगी नसल्याचं आव्हाड म्हणाले.
शरद पवार यांनी विधिमंडळ गटनेते म्हणून जयंत पाटील आणि मुख्य प्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाड यांची निवड केली. मात्र, त्यांच्या या निवडीला आम्ही विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे पात्र देऊन आव्हान दिले आहे असे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
प्रफुल्ल पटेल यांनी निवड पक्षाच्या कार्यकारणीने केली आहे आणि त्याना बदलण्याचा अधिकार आहे. नियमानुसार पाहिले तर त्यांना प्रफुल्ल पटेल यांना बडतर्फ करण्याचा अधिकार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या विकासाप्रती बांधील आहोत. आम्ही कोणालाही बडतर्फ करणार नाहीत. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना त्याच्या विधानसभा क्षेत्रासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला जाईल. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आमच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. कोणताही वाद होवू नये हा आमचा हेतू आहे. आम्हीच पक्ष असल्यामुळे आम्ही कोणताही आकडा सांगत नाही. पण, आता जे आकडे सांगत आहे तो पक्ष नाही असे छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.