पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या ((Vitthal rukmini Darshan) पदस्पर्श दर्शनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दोन दिवसापूर्वी शासनाकडे पदस्पर्श दर्शनाचा प्रस्ताव दिला होता. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या समवेत मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि मंदिर समितीचे सदस्य यांच्यात बैठक झाली. यात पुन्हा पदस्पर्श दर्शन सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून पदस्पर्श दर्शन (Corona) बंद होते. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक गोष्टींवर मर्यादा आणल्या होत्या. दोन वर्षा वारीही बसनेच पार पडली आहे. यावरून अनेकदा वारकऱ्यांची आंदोलनही झाली. मात्र कोरोनामुळे अनेक सण, यात्रा उत्सव रद्द करण्यात आले होते. त्यामुळे विठ्ठल दर्शनावरही मर्यादा आल्या होत्या.
पदस्पर्शाने कोरोना वाढण्याची भिती पसरली होती. त्यामुळे काही काळ पदस्पर्श दर्शन भक्तांसाठी बंद करण्यात आले होते. काही काळ विठोबाही आपल्या भक्तांच्या भक्तीला पोरका झाला होता. पंढरपूरला आपल्या धार्मिक इतिहासात दक्षिण काशीचे स्थान आहे. सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनसाठी रोज लाखो नागरिक पंढरीत दाखल होता. आणि आपल्या लाडक्या विठोबाचे दर्शन घेतात. पंढरपूर आणि शिर्डी या दोन्ही धार्मिक ठिकाणी देशभरातून भाविकांची रिघ वर्षभर सुरू असते. गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे अनेक धार्मिक स्थळेही बंद करण्यात आली होती. काही मोजक्या लोकांनाच्या उपस्थित पूजा पार पडत असे. यंदाची वारीही मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत बसने पार पडली आहे. त्याच पाश्वभूमिवर काही कठोर निर्णय प्रशासनाला आणि मंदिर समित्यांना घ्यावे लागले होते.
आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने. पुन्हा सर्व पूर्वपदावर येत आहे. पुन्हा थोडी मोकळीक मिळत आहे. मास्क आणि सोशल डिन्स्टिंग सोडलं तर इतर नियम हटवण्यात आले आहेत. पुन्हा धार्मिक स्थळांचा गजबटात वाढत आहे. आपल्या लाडक्या विठोबाचे भाविकांना पुन्हा दर्शन घेता येत आहे. या निर्णयामुळे विठू भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांना पुन्हा आपल्या विठोबाच्या पायांना स्पर्श करता येणार असल्याने चैतन्याचे वातावरण आहे.
Nagpur Dogs | रामटेकमध्ये कुत्र्याचा मुलीवर प्राणघातक हल्ला, 10 वर्षीय मुलगी गंभीर जखमी
जळगावमध्ये संपकरी एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; चिठ्ठी लिहून रेल्वेसमोर उडी, आर्थिक विवंचनेने हतबल