महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीपूर्वी पैसे वाटपाचा आरोप सुरु झाला आहे. छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उबाठाने आरोप केला आहे. तसेच नालासोपारा येथे बहुजन विकास आघाडीने भाजपवर पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. या ठिकाणी भाजप नेते विनोद तावडे यांना बहुजन विकास आडीच्या कार्यकर्त्यांनी घेरले आहे.
पैसे वाटप करण्याचा आरोपावरुन नालासोपारा येथे भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये तुफान राडा झाला. भाजप केंद्रीय नेते विनोद तावडे यांच्यासह नालासोपारा येथील भाजप उमेदवार राजन नाईक यांना हॉटलमध्ये घेरले. त्यावेळी दोन्ही गटात तुफान राडा झाला आहे. विरार पूर्व मनवेलपाडा येथील विवांत हॉटलमध्ये हा प्रकार झाला आहे. विनोद तावडे, भाजप उमेदवार राजन नाईक, बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी विनोत तावडे यांना जाब विचारला. तुम्ही या ठिकाणी का आलात? असा प्रश्न विचारला. भाजपकडून विनोद तावडे कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आले असल्याचे सांगितले.
विनोद तावडे यांनी पाच कोटी रुपये आणले होते, असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केली. त्या ठिकाणी त्यांची डायरी आणि लॅपटॉप मिळाल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले.
छत्रपती संभाजीनगर शहरात बोटाला शाही लावून पैसे वाटप करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे. फेसबुक पोस्ट करत त्यांनी हा आरोप केला. बोटाला शाही लावून मतदान कार्ड जमा करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जवाहर नगर पोलिसांनी 18 लाख जमा केल्याचा पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. आमदार संजय शिरसाठ यांच्या सांगण्यावरून 2 कोटी रुपये पोलिसांनी सोडल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
मतदारसंघात पैसे वाटपाचे कार्यक्रम हे पूर्वनियोजित कटकारस्थान आहे. जाणीवपूर्वक व्हिडिओ काढला आहे. आमचा यात संबंध नाही. पोलिसांनी त्याची चौकशी करावी. पराभव दिसत असल्याने ते असले व्हिडिओ फिरवत आहे. 2 कोटी सोडले तर तपास करा ना, असे आव्हान संजय शिरसाठ यांनी दिले आहे.