मुंबई : भारतीय संविधानाचे निर्माते, भारतरत्न, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. संपूर्ण देशात जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर भीमसागर उसळला आहे. तसेच राज्यात विविध ठिकाणच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत आज सायंकाळी मिरवणुका निघणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मूर्म आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशवासियांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जळगाव :
जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मंत्री गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांसमवेत ढोल ताशांच्या तालावर ताल धरून जल्लोष साजरा केला. दरम्यान याप्रसंगी गुलाबराव पाटलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पाळधी गावात गेल्या काही दिवसांपूर्वी दोन गटात झालेल्या दगडफेकीमुळे तणावाचे वातावरण होते मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण पाळधी गावात शांततेचे वातावरण असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे
आई प्रतिष्ठानतर्फे 135 शालेय विद्यार्थिनींना शैक्षणिक दत्तक घेतले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कृतिशील अभिवादन
विडी घरकूल येथील मार्कंडेय हायस्कूलच्या विद्यार्थिनींना साहित्य भेट
विडी घरकुल येथील विडी कामगारांच्या गरजू मुला-मुलींना मदत
ठाणे : जितेंद्र आव्हाड यांची सोशल मिडियाच्या माध्यमातून मानवंदना
आव्हाड यांच्याकडून समाजमाध्यमांचा अचूक वापर करून संदेश देण्याचा प्रयत्न
कमी शब्दात बाबासाहेबांचा जन्म, शिक्षण, फुले-शाहू-आंबेडकर यांच्यातील परस्पर संबंध यांची ओळख करून दिली
शाहू महाराजांनी काढलेले गौरवोद्गार, महात्मा फुलेंना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली मानवंदना आणि बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव..यांचा समावेश
इंस्टाग्रामच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केली आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
२०० कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च होणार आहे
लाखो भाविक बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी
जामनेर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक
मिरवणुकीत ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन
मिरवणुकीत भीमसैनिकांसोबत लेझीमच्या तालावर गिरीश महाजनांनी धरला ठेका
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त जामनेर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली
या मिरवणुकीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला
भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वरात्री दादर येथील चैत्यभूमीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं
आगामी 3 दिवस रात्री वांद्रे-वरळी सी लिंक वरील विद्युत रोषणाई सुरू ठेवण्याचे निर्देश एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि महाराष्ट्र सदनातील अधिकारी उपस्थिती होते.
गिरीश महाजन यांनी घेतला लेझीमच्या तालावर ठेका
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन
लेझीम पथक ढोल ताशाचा गजर सुरू, गिरीश महाजन यांनी घेतला लेझीम पथकात सहभाग
बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक, मिरवणुकीतील रथाचे गिरीश महाजन बनले सारथी
इंदू मिल स्मारकाचं काम युद्धपातलीवर सुरू
दर 15 दिवसांनी स्मारकाच्या कामाचा अहवाल मागवला
पुढील वर्षभरात स्मारक पूर्ण होणार
चैत्यभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा आंबेडकरी जनतेशी संवाद
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त दलित युवकांना टँकरचे होत आहे वाटप
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार वाटप
22 डिझेल, पेट्रोल टँकरचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार वाटप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त दलित युवकांना टँकरचे होत आहे वाटप
शिंदे-फडणवीस यांच्याकडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
इंदू मिल स्मारकाच्या कामाचा घेतला आढावा
संविधान पथाचा शिलान्यास करणार
चाळीसगावातील दीनबंधू आश्रम मोजत आहे शेवटच्या घटका
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आश्रमाचे रूप कधी पालटणार?
याच आश्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर झाले होते उपचार.
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132 वी जयंती
पुण्यात बाबासाहेबांच्या जयंती निमित्त भव्य देखावा
पुण्यातील दांडेकर पुलावर उभारण्यात आली गौतम बुद्धाची तब्बल 45 फूट उंचीची मूर्ती
छत्रपती संभाजी नगरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी
भडकल गेट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात गर्दी
शहरातील आंबेडकर प्रेमी नागरिकांची मोठी गर्दी
शहरात असणार तब्बल 1540 पोलिसांचा बंदोबस्त
3 डीसीपी 4 एसीपी 27 पोलीस निरीक्षक, 87 पीएसआय तर दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त
प्रत्येक मिरवणुकीला एक पोलीस असणार सोबत
रात्री 12 वाजेपर्यंत मिरवणूक काढण्यासाठी असणार परवानगी
क्रांती चौकात येणार सर्वाधिक मिरवणुकी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुलढाणा जिल्ह्यात दरवर्षीच मोठ्या हर्ष उल्हासात साजरी केली जाते
त्याच पार्श्वभूमीवर या वर्षी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीने गेल्या चार दिवसापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे
रात्री 12 वाजता बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात फटाक्याची मोठी आतिषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला सुरुवात केली
हातामध्ये निळे झेंडे घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला
स्पर्शरंग कला परिवाराच्या सदस्यांनी एक सेमी आकाराच्या 10 हजार 132 फोटोपासून बाबासाहेबांची प्रतिमा साकारलीय
8 बाय 8 फूटाचे पोट्रेट साकारण्यासाठी तब्बल 5 तास लागले आहेत
स्पर्शरंग परिवार दरवर्षी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ही प्रतिमा साकारण्यात आलीय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंती निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
राष्ट्रपती द्रौपदी मूर्म आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर जाऊन आंबेडकरांना अभिवादन केलं
चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवर भीमसागर उसळला