अमित शाह यांच्या विदर्भातील सर्व सभा रद्द, अचानक दिल्लीकडे रवाना

| Updated on: Nov 17, 2024 | 11:59 AM

Amit Shah Elections All Rallies Cancele: अमित शाह यांच्या विदर्भात चार सभा रविवारी होणार होत्या. ते या सभा रद्द करुन तातडीने नागपूरवरुन दिल्लीकडे रवाना झाले आहे. आता अमित शाह यांच्या ऐवजी स्मृती ईराणी सभा घेणार आहे. राज्यातील प्रचार उद्या संपणार आहे.

अमित शाह यांच्या विदर्भातील सर्व सभा रद्द, अचानक दिल्लीकडे रवाना
Follow us on

Amit Shah Elections All Rallies Cancele: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर असलेले भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रविवारी होणाऱ्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या आहेत. अमित शाह यांच्या विदर्भात चार सभा होणार होत्या. या सभा रद्द करुन तातडीने नागपूरवरुन दिल्लीकडे रवाना झाले आहे. त्यांच्या सभा का रद्द झाल्या? या सभा प्रशासकीय कारणांमुळे रद्द झाल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. अमित शाह यांच्याऐवजी आता स्मृती ईराणी सभा घेणार आहे.

राज्यात उद्या प्रचार संपणार

अमित शाह यांच्या रविवारी विदर्भात चार सभा होणार होत्या. गडचिरोली, वर्धा, काटोल आणि सावनेर येथे सभा होणार होत्या. परंतु त्यांच्या या सर्व सभा रद्द करण्यात आल्या आहे. राज्यातील निवडणूक प्रचार १८ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे प्रचारास केवळ एकच दिवस शिल्लक असताना अमित शाह यांच्या सर्व सभा रद्द झाल्या आहेत. ते तातडीने नागपूरवरुन नवी दिल्लीकडे रवाना झाले आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपकडून दुजोरा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून मित शाह ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहे. त्यानुसार रविवारी त्यांच्या चार सभा होणार होत्या. परंतु त्यांनी या सभा रद्द केल्या आहेत. भाजपच्या विदर्भ संघटन मंत्र्यांकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. प्रशासकीय कामांसाठी अमित शाह यांनी दौरा रद्द केला आहे. ते दिल्लीकडे रवाना झाल्याचे भाजपच्या संघटन मंत्र्यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांना दिली श्रद्धांजली

दरम्यान, अमित शाह यांनी रविवारी सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी लिहिले की, बाळासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन सनातन संस्कृती आणि राष्ट्रहिताला अर्पण केले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना नमन करतो. देशात जेव्हा जेव्हा विचारधारेशी समर्पण आणि तत्त्वांशी बांधिलकीची चर्चा होते तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची आठवण नक्कीच येते. प्रतिकूल परिस्थितीतही विचारधारा आणि राजकीय मूल्यांशी तडजोड न करणाऱ्या सनातन संस्कृती आणि धर्माप्रती बाळासाहेबांची बांधिलकी प्रेरणादायी आहे.