अमित शाह यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, काय घडतंय राजकारणात?

| Updated on: Nov 08, 2024 | 10:35 PM

अमित शाहांनी त्यांच्या प्रचाराच्या पहिल्याच दिवशी फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदावरुन संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांनी आपण कॉम्प्रोमाईज करणार असल्याचं TV9च्या मुलाखतीत म्हटलंय.

अमित शाह यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, काय घडतंय राजकारणात?
अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस
Follow us on

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात शिराळातून प्रचाराला सुरुवात केली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचे संकेत दिले आहेत. महायुतीचं सरकार बनवा आणि फडणवीसांना विजयी करा, असं अमित शाह म्हणाले आहेत. तर अजित पवारांनी थांबण्याची तयारी दर्शवली. अमित शाह शिराळात बोलत होते. त्यांच्या स्टेजवर तेव्हा फडणवीस उपस्थितही नव्हते. ना फडणवीस शिराळातून उमेदवार आहेत. तरीही महायुतीचं सरकार आणा, असं आवाहन समजू शकतो. पण फडणवीसांना विजयी करा, असा आवर्जुन उल्लेख शाहांनी केला. त्यामुळे फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचे संकेत शाहांनी दिलेत का? अशी चर्चा सुरु झालीय.

एकीकडे अमित शाहांच्या वक्तव्यामुळं फडणवीसांची पुन्हा चर्चेत फ्रंटफुटवर आलेत. तर, अजित पवारांनी TV9च्या मुलाखतीत आपण कॉम्प्रोमाईज करणार, असून थांबतो असं निकालाआधीच म्हटलंय. तर त्यांच्याच पक्षाचे नेते नरहरी झिरवळ यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री होणं सोपं नाही, संख्याबळ आवश्यक आहे, असं झिरवळ म्हणाले आहेत.

मोदींचा मविआला चिमटा

अजित पवार महायुतीत फक्त 55 जागाच लढत आहेत आणि भाजप 152 जागांवर लढतेय. फरक स्पष्ट आहे, आमदार सर्वाधिक भाजपचेच निवडून येतील. त्यामुळे फॅक्ट पाहूनच अजित पवार आपण मुख्यमंत्रिपदासाठी थांबणार असं सांगत आहेत. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी महाविकास आघाडीतल्या मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेवरुन चिमटा काढला. महाविकास आघाडीत ड्रायव्हर सीटवर बसण्यासाठी भांडणं सुरु झाल्याचं मोदी म्हणाले आहेत.

महायुतीत सध्या 3-3 मुख्यमंत्रिपदाचे चेहरे आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे, भाजपकडून देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीकडून स्वत: अजित पवार. पण कॉम्प्रोमाईजसाठी तयार असल्याचं सांगून थांबतो, असं अजित दादा TV9शी बोलताना म्हणाले आहेत. म्हणजेच सध्या शिंदे आणि फडणवीस हेच महायुतीत स्पर्धेत आहेत. अर्थात 20 तारखेला जनता कोणाला कौल देणार? यावर मुख्यमंत्रिपदाचं भवितव्य असेल.