अमरावती : अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल अमरावती जिल्ह्यात 598 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी महानगर पालिका आयुक्तांयांनी शहरातील व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. शहरातील गजबजलेली आणि मुख्य बाजारपेठ समजणारी सक्कर साथ या बाजारपेठेतील दुकाने सायंकाळी सहा वाजताच बंद करण्याचा निर्णय इथल्या व्यापाऱ्यांनि घेतला आहे. (amravati traders decided to close the shops and main market at 6 pm)
अमरावतीमध्ये मास्क न वापरणाऱ्यवर कडक कारवाई
अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे. यामुळे अमरावती महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात येत आहेत. घराच्या बाहेर निघताना मास्क अत्यंत आवश्यक आहे. मास्क जर नाही वापरलं तर त्यांच्यावर पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यामुळेच आता घराच्याबाहेर निघताना अमरावतीकरांनी मास्क लावूनच बाहेर निघा. संध्याकाळी आठ वाजतापासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी सहावाजेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे. शिवाय रविवार दिवस अत्यावश्यक सेवा सोडून पूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे.
गेल्या 5 दिवसात कोरोना रुग्ण व मृत्यू
दिनांक 19 – 598 मृत्यू 1
दिनांक 18 – 452 मृत्यू 4
दिनांक 17 – 448 मृत्यु 6
दिनांक 16 – 442 मृत्यु 3
दिनांक 15 – 439 मृत्यु 4
मागच्या 8 दिवसातली चाचण्यांची आकडेवारी
दिनांक 12 – 24 हजार 519
दिनांक 13 – 24 हजार 895
दिनांक 14 – 25 हजार 294
दिनांक 15 – 25 हजार 743
दिनांक 16 – 26 हजार 228
दिनांक 17 – 26 हजार 726
दिनांक 18 – 27 हजार 323
दिनांक 19 – 27 हजार 921
दाखल रूग्ण – 861
डिस्चार्ज : प्रगतीपर 24 हजार 685
गृह विलगीकरण (ग्रामीण) – 880 आजपर्यंत 1982
मृत्यू – एकूण 453
ऍक्टिव्ह रुग्ण – 2783 (amravati traders decided to close the shops and main market at 6 pm)
कोरोना रोखण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांचे कडक पाऊल
– विवाह सोहळ्यात 50 पेक्षा जास्त नागरिक आढळल्यास मंगल कार्यालय संचालकाला 50 हजार रुपये दंड तसेच आई वडिलांवरवर ही कारवाई होणार. 50 पेक्षा जास्त लोक असल्यास 500रू प्रती नागरिक दंड.
– हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त नागरिक आढळल्यास 25 हजार रुपयांचा दंड.
– हॉटेलची वेळ रात्री 11 वरून 10 करण्यात आली आहे.
– होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांकडून बंध पत्र घेणार कोरोना नियमाचं उल्लंघन केल्यास 25 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
– शहरातील गजबजलेली आणि मुख्य बाजारपेठ समजणारी सक्कर साथ या बाजारपेठेतील दुकाने सायंकाळी 6 वाजताच बंद करण्याचा निर्णय (amravati traders decided to close the shops and main market at 6 pm)
संबंधित बातम्या –
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? सामना संपादकीयमधून सूचक इशारा?
मोठी बातमी ! राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, विजय वडेट्टीवार यांचे संकेत
एकाच व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोना होण्याचे चान्सेस आहेत का?; वाचा स्पेशल रिपोर्ट
(amravati traders decided to close the shops and main market at 6 pm)