अमरावती : मध्यप्रदेशमधील (Madhya Pradesh) नर्मदापूर जिल्ह्यातील सिवनी माळवा तालुक्यात गाय तस्करीचा आरोप करत तीन तरुणांला बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर या मारहाणीत एका तरूणाची हत्या देखील करण्यात आलीयं. मोठ्या प्रमाणात गायी ट्रकमध्ये भरून घेऊन जाणाऱ्या लोकांवर तस्करीचा (Smuggling) आरोप करत बेदम मारहाण (Beating) केली. या घटनेत 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. नझीर अहमद असे मृत युवकाचे नाव आहे. लाला शेख आणि मुस्ताक अहमद असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.
संपूर्ण प्रकरण सिवनी माळवा तहसीलमधील बारखड गावचे आहे. जिथे गाय तस्करीचा आरोप करत तरुणांना टेम्पोसह रोखून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. जो महाराष्ट्र अमरावतीचा रहिवासी असल्याचे सांगितले जाते. याशिवाय 2 जण गंभीर जखमी आहेत. सध्या जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मध्यप्रदेश मधील नर्मदापूर जिल्ह्यातील सिवनी माळवा तालुक्यात घडलेल्या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. या तरूणांवर गाय तस्करी करत असल्याचा आरोप करण्यात आलायं. टेम्पो रोखून धरत तिघांना मारहाण करण्यात आलीयं. या मारहाणीत एका तरूणाचा जागीच जीव गेल्या तर इतर दोघे गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. या मारहाणीत ज्या तरूणाचा जीव गेलाय, तो तरूण अमरावतीचा रहिवासी आहे.