अमरावती : असे म्हटले जाते की, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. या म्हणीचा पुन्हा एकदा प्रत्येय आला आहे. अमेरिकेतील एका युवकाने चक्क अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमधील (Daryapur) रहिवासी असलेल्या तरुणीसोबत विवाह (Marriage) केला आहे. विशेष म्हणजे हा तरुण अमेरिकेमध्ये (USA) सायबर क्राईम विभागामध्ये मोठा ऑफिसर आहे. अॅड्र्यू रॉबिनसन असे या तरुणाचे नाव आहे. रॉबिनसन हे अमेरिकेतील हॅमट्रॅ्म्क मिशिगन येथील रहिवासी आहेत. तर तरुणीचे नाव श्रद्धा म्हस्के असून, ती दर्यापूरमध्ये राहाते. श्रद्धा ही सामान्य कुटुंबातील एक उच्चशिक्षित तरुणी आहे. अमेरिकेमध्ये वास्तव्याला असलेल्या मुळ भारतीय रोशन शहा व त्यांची पत्नी ज्योती शहा यांच्याशी फेसबूकच्या माध्यमातून श्रद्धाची ओळख झाली. पुढे त्यांच्या माध्यमातून अॅड्र्यू आणि श्रद्धा यांचा परिचय झाला. त्यांची फेसबुकवर मैत्री झाली. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्लाचा निर्णय घेतला. अखेर 2 फेब्रुवारी रोजी अॅड्र्यू आणि श्रद्धाचा विवाह संपन्न झाला.
अॅड्र्यू रॉबिनसन हा तरुण अमेरिकेमधील मिशिगन प्रांतात राहातो. तो तेथील पोलीस खात्यात मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्याचे वडील देखील निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. तर आई शिक्षिका आहे. अॅड्र्यू आणि श्रद्धाची ओळख सर्वप्रथम बेसबुकच्या माध्यमातूनच झाली. मुळ भारती असलेल्या मात्र आता अमेरिकेत स्थाईक झालेल्या रोशन शहा आणि त्यांची पत्नी ज्योती शहा यांच्या माध्यमातून त्यांची जवळीक आणखी वाढली. अॅड्र्यूला श्रद्धाचा स्वाभाव आवडला आधी त्यांच्यामध्ये मैत्री झाली, पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न देखील केले. हा सर्व प्रवास स्वन्पवत असल्याची प्रतिक्रिया नवदाम्पत्याने दिली आहे.
उच्चशिक्षित श्रद्धा ही पुण्यात एका टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये टूर गाईड म्हणून कार्यरत होती. तीन वर्षांपूर्वी शाह दाम्पत्य या कंपनीमार्फत नालंदा, सारनाथ येथे पर्यटनाला आले होते. यावेळी तिची शहा दाम्पत्याशी ओळख झाली. तिच्या मृदु स्वभावामुळे त्यांचे तिच्याशी स्नेहबंध जुळले. ते त्यानंतर देखील तिच्याशी फेसबुकच्या माध्यमातून कायम संपर्कात राहिले. याच सुमारास अॅड्र्यू देखील तिच्या संपर्कात आला. ते यापूर्वी कधीच भेटले नव्हते मात्र तरी देखील त्यांच्यामध्ये शहा दाम्पत्याच्या पुढाकाराने मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
सरकारचा डोंबिवलीकरांसाठी खास निर्णय, ‘त्या’ निर्णयाचे मनसे आमदाराकडून स्वागत