अमरावती : कुत्र्यांमध्ये पसरतोय कैनाईन पार्वो व्हायरस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

| Updated on: Feb 08, 2022 | 9:14 PM

तुम्ही घरात कुत्रा पाळला असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण सध्या मोकाट कुत्र्यांसह पाठीव कुत्र्यांना विविध आजारांचा प्रर्दुभाव होत असल्याचे समोर आले आहे. विशेष: सध्या कुत्र्यांना एका नव्या आजाराने ग्रासले आहे. या आजाराचे नाव  पार्वो व्हायरल इन्फेक्शन असे आहे.

अमरावती : कुत्र्यांमध्ये पसरतोय कैनाईन पार्वो व्हायरस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
संग्रहित छायाचित्र
Follow us on

अमरावती : तुम्ही घरात कुत्रा पाळला (Dogs) असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण सध्या मोकाट कुत्र्यांसह पाठीव (Pets) कुत्र्यांना विविध आजारांचा (Diseases) प्रर्दुभाव होत असल्याचे समोर आले आहे. विशेष: सध्या कुत्र्यांना एका नव्या आजाराने ग्रासले आहे. या आजाराचे नाव  पार्वो व्हायरल इन्फेक्शन असे आहे. या आजारात कुत्र्याला सर्दी, खोकला, ताप या आजारांची लक्षणे दिसतात. त्यानंतर या आजाराची लागण झालेल्या कुत्र्याचा तडफडून मृत्यू  होतो. गेल्या महिन्याभरापासून कुत्र्यांना या आजाराने ग्रासले असून, शहरातील पशु रुग्णालयात  पार्वो व्हायरलची लागण झालेल्या शेकडो कुत्र्यांवर गेल्या काही दिवसांमध्ये उपचार करण्यात आल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. पाळीव कुत्र्यांपेक्षाही भटक्या कुत्र्यांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे. ही कुत्री भटकी असल्यामुळे त्यांचामार्फत या आजाराचा प्रसार हा अधिक वेगाने होतो.

नागरिकांमध्ये भीती

आज साधारणपणे पाहिले तर प्रत्येकाच्या घरात एक पाळीव कुत्रा दिसून येतो, माणसांना या पाळीव प्राण्याचा लळा लागलेला असतो. कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच या प्राण्यांना वागणूक दिली जाते. मात्र सध्या कुत्र्यांना विविध आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याने नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे. गेल्या दोन वर्षांपासून जगावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील नागरिक आधिच त्रस्त असल्यामुळे आता त्यात भरीसभर म्हणून प्राण्यांना देखील विविध आजारांनी ग्रासले आहे.

तिवसा शहरात 80 कुत्र्यांना लागण

जगावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. सोबतच बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांची लक्षणे देखील दिसून येत  आहेत, मध्यतंरी पक्ष्याना बर्ड फ्लूचा आजार झाला होता. त्यामध्ये अनेक पक्ष्यांचा विशेष: कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता पाळीव प्राण्यांमध्ये देखील  पार्वो व्हायरल इन्फेक्शन या आजारांची लक्षणे दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून दिवसाकाठी तिवसा शहरातील पशु वैद्यकीय रुग्णालयता या आजाराने ग्रस्त असलेल्या जवळपास सात ते आठ कुत्र्यांवर उपचार केले जात आहे. कालपर्यंत सुमारे 80 कुत्र्यांवर उपचार केल्याची माहिती पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली. तसेच घरात कुत्रा पाळला असेल तर  घरातील लहान मुलांना या कुत्र्यांपासून दूर ठेवण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

सिगारेट सोडल्यानंतर कसे वाटते ? शरीरात जाणवतात नेमके कोणते जाणवतात बदल?

कच्चे दूध पिण्याचे हे धोके माहिती आहेत काय? वेळीच सावध व्हा…

अनवाणी चालण्याचे फायदे ऐकून थक्क व्हाल, डोळ्यांपासून हृदयापर्यंत अनेक चमत्कारी बदल