चालकाचे नियंत्रण सुटलं अन् बस थेट दरीत, त्या प्रवाशांचं काय झालं?; अमरावतीच्या मेळघाटात भीषण अपघात

| Updated on: Jul 02, 2024 | 4:37 PM

हा अपघात इतका भीषण होता की खासगी बस पलटी होऊन थेट दरीत कोसळली. या बसमध्ये जवळपास 25 ते 30 प्रवाशी प्रवास करत होते.

चालकाचे नियंत्रण सुटलं अन् बस थेट दरीत, त्या प्रवाशांचं काय झालं?; अमरावतीच्या मेळघाटात भीषण अपघात
अमरावीत बस अपघात
Follow us on

Amravati Bus Accident : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात एक खाजगी ट्रॅव्हल बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. यात 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही बस अकोटहून धारणी या ठिकाणी जात होती. अकोट-धारणी मार्गावरील खटकाली फाट्याजवळील ही घटना घडली.

अकोटवरून धारणी येथे जात असताना अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटाच्या हाय पॉइंटजवळ एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस थेट दरीत जाऊन कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की खासगी बस पलटी होऊन थेट दरीत कोसळली. या बसमध्ये जवळपास 25 ते 30 प्रवाशी प्रवास करत होते. ही बस अकोटवरून धारणी येथे जात असताना हा अपघात घडला.

22 प्रवासी जखमी, 3 गंभीर

या अपघातात 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यासोबतच अकोटवरुन एकलव्य बचावपथक आणि रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी रवाना झाले. या पथकाने प्रवाशांना दरीतून काढण्याचे काम केले. तसेच या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमींवर उपचार सुरु

या बस अपघातात सर्व लहान मुलं सुरक्षित असल्याचेही सांगितले जात आहे. तसेच इतर काही जखमी लोकांना सुखरुप दरीतून काढण्यात पोलीस आणि स्थानिकांनी यश झाले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना टेम्ब्रूसोडा आणि अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तसेच पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.