सुरेंद्रकुमार आकोडे, अमरावती : अमरावती (Amravati) जिल्ह्यातील दर्यापूर (Daryapur) येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृहामध्ये (government hostel) तब्बल 75 विद्यार्थी सध्या तिथं राहत आहेत. शासनाकडून या विद्यार्थ्यांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येते. मात्र आता या शासकीय वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात येत असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केले आहेत. या शासकीय वसतिगृहामध्ये आज विद्यार्थ्यांना जेवण्यात देण्यात आलेला आहारातील पोळी मध्ये चक्क प्लास्टिक आढळून आलं आहे. ही बाब विद्यार्थ्याला जेवण करताना लक्षात आल्याने सुदैवाने अनुचित घटना घडली आहे.
या संदर्भात विद्यार्थ्यांनी वस्तीगृहातील व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार केली असता व्यवस्थापकाने विद्यार्थ्यांना थातूरमातूर उत्तरं दिले. परंतु संबंधित आहार बनवणाऱ्या ठेकेदारावर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या आत्तापर्यंत अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.
संबंधित ठेकेदाराला शासनाकडून प्रत्येकी एक विद्यार्थी 3450 रुपये प्रमाणे मोबदला देण्यात येतो. या शासकीय वस्तीगृहामध्ये तब्बल 75 विद्यार्थी असून संबंधित ठेकेदाराला महिन्याला लाखो रुपये शासनाकडून देण्यात येतात. मात्र तरीही विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं भोजन देण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी आता या गंभीर बाबीकडे लक्ष देणार का ? किंवा ते काय करवाई करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे अशी माहिती शासकीय वस्तीगृह दर्यापूर, व्यवस्थापक, अनील खेडकर यांनी दिली.
शासनाकडून विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी शासकीय वसतीगृहाला पैसे देण्यात येतात. तरीसुध्दा असा प्रकार घडत असल्यामुळे अनेकांनी आच्छर्य व्यक्त केले आहे. त्याचबरोबर ही गोष्ट अमरावती जिल्ह्यात व्हायरल झाल्यामुळे कारवाईची मागणी लोकांनी केली आहे. पालकांनी सुध्दा नाराजी व्यक्त केल्याची माहिती समजली आहे. सगळ्याचं लक्ष कारवाईकडे लागलं आहे.