अमरावती : आमदार रवी राणा (Ravi Rana) व खासदार नवनीत राणांच्या युवा स्वाभिमान पार्टीतील काही अल्पसंख्याक(मुस्लिम) पदाधिकारी राजीनामे देणे सुरू केले आहे. युवा स्वाभिमानच्या अल्पसंख्याक पदाधिकारी भोंगे आणि हनुमान चालीसाच्या मुद्यावरून नाराज आहेत. राणा दाम्पत्याने मागील काही दिवसात हिंदुत्ववाचा मुद्दा लावून धरल्याने मुस्लिम पदाधिकारी (Muslim activists) नाराज असल्याची माहिती आहे. माजी सभापती अयुब खान मुस्तपा (Ayub Khan Mustapa) यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केलंय. अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षांसह बारा पदाधिकारी राजीनामे देणार असल्याची माहिती आहे. युवा स्वाभिमान (Yuva Swabhimani) पक्षाची विचारधारा बदलल्याने राजीनामा देत असल्याचे पदाधिकारी यांचे म्हणणे आहे. भोंगे आणि हनुमान चालीका यावरून मुस्लीम कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती आहे. युवा स्वाभीमानीचे मुस्लीम पदाधिकारी-कार्यकर्ते नाराज झालेत.
अमरावतीमध्ये आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातले काही अल्पसंख्यांक म्हणजे मुस्लिम पदाधिकारी राजीनामे देत आहेत. राणा दाम्पत्यानं विकासाचं राजकारण केव्हा केलं, असा सवाल आता त्यांनी विचारलाय. गेल्या काही दिवसांत राणा दाम्पत्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा समोर केलाय. हनुमान चालीसा म्हणून भोंगे वाटप केले. यातून विकास कुठे होतो, असा मुस्लीम पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. त्यामुळंच त्यांनी राजीनाम्याचं अस्त्र बाहेर काढलंय.
अमरावतीत राणा दाम्पत्य विकासकामं कमी करतात. हिंदुत्वाचं राजकारण जास्त करतात, अशी टीका करत मुस्लिम समाजातील काही युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारलंय. त्यामुळं राणा दाम्पत्याला हा झटका मानला जातोय. रवी राणा हे शनिवारी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार आहेत. यातून त्यांना कोणता विकास साधायचा असा प्रश्न मुस्लिम कार्यकर्ते विचारत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राणा दाम्पत्य विकासाच्या कामांवरून दुर्लक्ष झालंय. त्यामुळं त्यांच्यासोबत राहून विकासकामे होणार नसतील तर, कशाला राहयचं असं मुस्लीम पदाधिकाऱ्यांचं म्हणण आहे. त्यामुळं काही कार्यकर्ते राणा दाम्पत्यांपासून दूर जात आहेत. तर, या मुद्द्यावरून काही हिंदू कार्यकर्ते राणा दाम्पत्याशी जुळले गेले आहेत.