अमरावती लोकसभा निवडणुकीत उभ्या महाराष्ट्राने काँटे की टक्कर पाहिली. नवनीत राणासाठी भाजपने जंग जंग पछाडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा झाली. महायुतीचे राज्यातील बड्या बड्या नेत्यांनी अमरावतीत तळ ठोकला. पण ही जागा काँग्रेसने खेचून आणली. महाविकास आघाडीने अमरावतीत जोर का झटका दिला. आता यशोमती ठाकूर यांच्या आरोपांनी राजकारण पुन्हा तापलं आहे. त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
दंगल केली म्हणून खासदारकी
मागच्या वेळी अमरावतीत दंगल केली म्हणून अनिल बोंडे यांना खासदारकी मिळाली असा गंभीर आरोप काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केला. अनिल बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. गेल्या दीड तासापासून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडेसह काँग्रेस कार्यकर्त्यांच पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या दालनात आंदोलन सुरू आहे.
वायफळ माणूस भाजपने त्याला खासदार केलं,गुन्हे दाखल झाले पाहिजे. अनिल बोंडे डोक्यावर पडला आहे. देवेंद्र फडणवीस हे दंगल घडवन्यासाठी अनिल बोंडे यांना बेताल वक्तव्य करायला लावतात. गुन्हे दाखल होईपर्यंत उठणार नाही पोलीस यंत्रणा बहिरी झाली का? असा सवाल त्यांनी विचारला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती पोलिसांवर दबाब आहे. त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असे त्या म्हणाल्या.
अनिल बोंडे यांचं संतुलन बिघडल
खासदार अनिल बोडे यांनी आरक्षणासंदर्भात परदेशात जाऊन जे काही बोलले ते भयानक आहे. त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजेत असा वादग्रस्त वक्तव्य अनिल बोंडे यांनी केले होते. त्यावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. डॉ. अनिल बोंडे यांचं संतुलन बिघडलं आहे. एखादा अडाणी व्यक्ती असं बोलत असेल तर समजू शकतो. पण डॉक्टर असणारी व्यक्ती असं काही विधआन करत असेल तर नक्कीच त्याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करावं. बोंडे यांना महाराष्ट्रात आणि अमरावतीत दंगल घडवायची आहे. त्यामुळे ते अशी वक्तव्य करत असल्याचा आरोप ठाकुर यांनी केला आहे.