नाल्याच्या बाजूला पलटल्याने काही प्रवासी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघात पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. प्रवाशांनी बचावलो बाबा एकदाचं म्हणत सुटकेचा निश्वःस टाकला.
घटनेनंतर वाहन चालक पळून गेला. बस रस्त्याच्या बाजूला पडून होते.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. काही जण या अपघातात किरकोळ जखमी झाले.
मोर्शीमार्गे मध्यप्रदेशमधील बैतुलकडे ही खासगी बस जात होती. पण, पलटी झाल्याने बसची अशी अवस्था झाली.
अमरावतीतील अर्जुननगर परिसरातील घटना घडल्यानंतर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. पोलीसही घटनास्थळी पोहचले.