नेहमीच चर्चेत असणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती आहे. आमदार बच्चू कडू यांनी स्वत: या संदर्भात जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. गोपनीय माहितीनुसार, माझ्या जिवीताला धोका आहे, असं बच्चू कडू यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत आहेत. अपघात झाल्याची कोणीतरी अफवा पसरवत आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची बच्चू कडू यांनी मागणी केली आहे. सध्या बच्चू कडू यांना पोलिसांची वाय प्लस सुरक्षा आहे. बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. बच्चू कडू हे आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात. नेहमीच ते रोखठोक, स्पष्ट भूमिका घेतात.
बच्चू कडू यांचा घातपात करण्याचा कोणाचा प्लँन?
बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहलेल्या पत्रातील ठळक मुद्दे.
“शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी गडचिरोली येथे राहत असून माझे नक्षलवाद्यांशी नजीकचे संबंध आहेत. बच्चू कडूला पाहून घेऊ. जसे बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेंना संपवले, तसं शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार नाहीत, तर मी स्वतः बच्चू कडूला संपवणार. बच्चू कडू म्हणजे काहीच नाही, बच्चू कडूला पाहून घेऊ.
आज मोका देख के बच्चू कडू को चौका मारेंगे
गेल्या अनेक दिवसापासून मतदारसंघातील नागरिकांचे बच्चू कडू यांना फोन येत आहेत. भाऊ तुमचा अपघात झाला का ?