मुंबई : खासदार नवनीत राणांची तब्बेत खालावल्याची माहिती आहे. काल त्यांचा रक्तदाब (Blood Pressure) वाढला होता. सध्या त्यांनी प्रकृती बरी असल्याची माहिती समोर येतेय. नवनीत राणा भायखळा कारागृहातील रुग्णालयात दाखल असल्याची माहिती आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी (Police Cell) सुनावण्यात आली. त्यानंतर राणा दाम्पत्यानं लगेच जामिनासाठी अर्ज (Application for Bail) केलाय. कोठडी सुनावल्यानंतर त्यांची चेलमध्ये रवानगी करण्यात आलीय. रवी राणांची तळोजा जेलमध्ये, तर खासदार नवनीत राणा यांची भायखळा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
खासदार नवनीत राणा यांची तब्येत काल खालावली होती. मेडिकल चेकअपमध्ये रक्तदाब वाढलेले आढळले. नवनीत राणा यांना भायखळा कारागृहाच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आले. त्याठिकाणी सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.नवनीत राणा यांची प्रकृती काल बरी नव्हती. रक्तदाब वाढलेला होता. त्यामुळं त्यांना भायखळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्या हनुमान चालीसा वाचत असल्याची माहिती आहे. अशी पोस्ट त्यांनी त्यांच्या फेसबूकवर टाकली आहे.
नवनीत राणांना फसविल्याची प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी जेलमध्ये जाताना दिली आहे. त्या दलित मागासवर्गीय महिला आहेत. मागासवर्गीय महिलेला उद्धव ठाकरे सरकारनं फसविल्याचं रवी राणा म्हणाले. ठाकरे सरकारनं आम्हाला फसवलंय. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, अशी प्रतिक्रियाही रवी राणा यांनी दिली. राजद्रोहाचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलाय.
आमदार रवी राणांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसेनेच्या मुख्य पदाधिकाऱ्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिव सैनिकांनी शनिवारी राणा दाम्पत्याविरोधात आंदोलन केले होते.