अमरावती : मागच्या तीन दिवसांपूर्वी औरंगाबादला वंचित बहुजन आघाडीच्या राज्याच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर (Rekhatai Thakur) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या बैठकीतला महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, प्रत्येक जिल्ह्याला स्वायत्तता देण्यात आली आहे. नगरपालिका (Municipalities), महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेत (Zilla Parishad) कोणाबरोबर युती करायची, कोणाबरोबर युती करायची नाही. याची स्वायत्ता देण्यात आली आहे. या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचं चांगला परफार्मन्स राहील, असं सांगतो. महाराष्ट्र समितीनं दोन पत्रक काढली आहेत. त्यामधून पक्षाची महत्त्वाची भूमिका मांडली आहे, असं वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रिम कोर्टात टीकणार नाही. यादृष्टिकोणातून खेळखंडोबा केला. सत्ताधारी श्रीमंत मराठा पाटील हा गरीब मराठ्याला स्वीकारू शकत नाही. ओबीसी तर त्यांच्या नात्या, गोत्या किंवा जातीतलाही नाही. श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याशी इमानदारी राखू शकत नाही. तर तो ओबीसींशी काय इमानदारी दाखविणार आहे, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला. ओबीसींना या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. त्यांच्या मंत्र्यांचा फक्त वापर केला जातोय. ओबीसीनं आता भूमिका घेतली पाहिजे, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय.
काश्मीरमध्ये साडेतीन जिल्हे आहेत. त्याठिकाणी अजूनही 5 लाख आर्मी उभी करून ही ताब्यात घेऊ शकले नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. जसं स्वतंत्र देशाला मिळालं तस आपणं स्वीकारलं पाहिजे. वाद कशाला घालायचा, असंही ते म्हणाले, मुसलमान मधला काही वर्ग आणि हिंदूमधला वर्ग या दोघांनी आता पूर्ण ताबा घेतला पाहिजे. तरच अशा दंगली थांबतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. लाल महाल ही ऐतिहासिक वास्तू आहे. त्या वास्तूमध्ये आता लावणीचं व्हिडीओ शूट करून सुरू झाले. यावर आपल्याला काय वाटते. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कोणाला परवानगी द्यावी हे तिथल्या मंडळांनी निर्णय घ्यावा.