अमरावती : आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा सध्या कारागृहात (Ravi Rana in Jail) आहे. त्यातच आज रवी राणा यांचा वाढदिवस आहे. मात्र, रवी राणा हे कारागृहात असल्याने ते त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला हजर राहू शकत नाही. वाढदिवसाच्या पूर्व संध्येला राणा कुटुंबाने आमदार रवी राणा यांचा वाढदिवस त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी साजरा केला. यावेळी रवी राणा यांची उपस्थिती नव्हती. त्यामुळं त्यांच्या मातोश्री सावित्री राणा (Matoshri Savitri Rana) यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी रवी राणा यांचे मोठे बंधू सुनील राणा (Sunil Rana) यांचा चिरंजीव याने केक कापून वाढदिवस साजरा केला. पण, दरवर्षीसारखी रौनक राणा दाम्पत्याच्या निवासस्थानी नाही. कार्यकर्त्यांची गर्दीही कमी झाली.
आमदार मुलाचा वाढदिवस असल्यानं घरी आनंदी वातावरण आहे. पण, रणी राणा हे यंदा घरी नाहीत. त्यामुळं चिंतेचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांतपासून राणा दाम्पत्य जेलमध्ये आहेत. रवी राणी आणि नवनीत राणांना अटक करण्यात आली आहे. अमरावतीचे आमदार आणि खासदार जेलमध्ये असल्यानं राणांचे कार्यकर्ते आणि कुटुंबीय चिंतेत आहेत. त्यांची सुटका केव्हा होते, याकडं त्यांचं लक्ष आहे. ही सुटका लवकर व्हावी, यासाठी ते देवाकडं प्रार्थना करत आहे. दरवर्षी वाढदिवसानिमित्त अमरावतीत मोठी चहलपहल असायची. शेकडो कार्यकर्ते रवी राणा यांनी भेटायला यायचे. पण, यंदा वाढदिवशी रवी राणा यांना जेलमध्येच राहावं लागणार आहे. त्यामुळं त्यांची आई जास्त चिंताग्रस्त झाली आहे. आपला मुलगा लवकर सुटावा, यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. तरुण मुलगा तोच आमदार वाढदिवशी जेलमध्ये असल्यानं त्यांच्या आई सावित्री यांचे डोळे पाणावले होते.
राणा दाम्पत्यांना मुलगी आहे. ही मुलगी काल माध्यमांसमोर दिसली. माझे आई-वडील लवकर सुटावेत, यासाठी मी देवाकडं प्रार्थना करत आहे, असं ती म्हणाली. तिची देवाकडं सुरू असलेली प्रार्थना पाहून राणांचे कार्यकर्ते भावूक झाले. मुलीनं केलेली प्रार्थना चर्चेचा विषय झाली. कोणत्याही मुलानं आपल्या आईवडिलांच्या सुटकेसाठी केलेली ही प्रार्थना आहे. पण, राणा दाम्पत्य जेलमधून केव्हा बाहेर पडतात, हे सध्या तरी सांगता येत नाही.