नागपूर: एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आज मीडियाशी सामोरे गेले. पण वाझेंना निलंबित करणार का? असा सवाल करताच देशमुख काहीही न बोलता निघून गेले. त्यामुळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. (Anil Deshmukhs no comment on sachin vaze arrest)
सचिन वाझे यांना 13 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी अनिल देशमुख मीडियासमोर आले. मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्कॉर्पिओमध्ये स्फोटके आढळून आली. त्यानंतर मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणाचा तपास एनआयए आणि एटीएस करत आहे. या तपासात जे काही उघड होईल. त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल, अशी सावध प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली. तर वाझे यांनी निलंबित करणार का? असा सवाल करताच देशमुख यांनी बोलण्यास नकार दिला आणि त्यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
13 तासांच्या चौकशीनंतर बेड्या
मुकेश अंबानींच्या अँटिलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना शनिवारी रात्री उशीरा NIA कडून अटक करण्यात आली. जवळपास 13 तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यानंतर एनआयएने सचिन वाझे यांनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवली, असा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी सकाळी 11 वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. यावेळी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल. त्यामुळे आता पोलीस कोठडीतील चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
वाझेंवर कोणते आरोप?
स्फोटके बाळगणे त्याचबरोबर अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असण्याच्या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले आहेत.
NIAच्या हाती सबळ पुरावा?
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांना अटक केल्यानंतर आता याप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. NIA ने शनिवारी सचिन वाझे यांनी तब्बल 13 तास कसून चौकशी केली होती. या चौकशीत NIAच्या हाती काहीतरी सबळ पुरावा लागल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. याप्रकरणी आता ठाण्यातील एका राजकीय नेत्याची चौकशी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सचिन वाझे आणि एका राजकीय नेत्याचे संबंध असल्याचा आरोप केला होता. NIAच्या चौकशीतही नेमकी हीच माहिती पुढे आल्याचे सांगितले जात आहे. ठाण्यातील हा नेता आणि सचिन वाझे यांचे आर्थिक संबंध होते. त्यामुळे आता याप्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Anil Deshmukhs no comment on sachin vaze arrest)
तपास सुरू आहे, बोलणं योग्य नाही
वाझेंच्या अटक प्रकरणी तपास सुरू आहे. तपास सुरू असताना बोलणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. शिसेना नेते संजय राऊत यांनी ‘सामना’च्या ‘रोखठोक’मध्ये विरोधकांना पुरावे मिळणं हे महाविकास आघाडीसाठी अशुभ संकेत असल्याच म्हटलं आहे. त्याबाबत थोरात यांना विचारण्यात आले असता त्यांनी त्यावर तपासाव लागेल असं सांगत अधिक भाष्य करण्यास नकार दिला. (Anil Deshmukhs no comment on sachin vaze arrest)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/brJ1PuJl6c
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 14, 2021
संबंधित बातम्या:
गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करा ; सचिन वाझेंच्या अटकेनंतर भाजप आणखी आक्रमक
सचिन वाझेंच्या घराला टाळं; कुटुंबीयही 10-12 दिवसांपासून गायब, NIA घराची झडती घेणार?
(Anil Deshmukhs no comment on sachin vaze arrest)