’10वी, 12वीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार’, Nagpur बोर्डात उत्तरपत्रिका पोहोचल्या
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या परीक्षा (Exam) ऑफलाइन(Offline)च होणार आहे. 10वी, 12वीच्या ॲाफलाइन परीक्षेसाठी नागपूर (Nagpur) विभागीय बोर्डात उत्तरपत्रिका पोहोचल्याची माहिती आहे. त्यासोबतच तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षेचं साहित्य पोहोचलंय.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या परीक्षा (Exam) ऑफलाइन(Offline)च होणार आहे. 10वी, 12वीच्या ऑफलाइन परीक्षेसाठी नागपूर (Nagpur) विभागीय बोर्डात उत्तरपत्रिका पोहोचल्याची माहिती आहे. त्यासोबतच तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षेचं साहित्य पोहोचलंय. यंदा विद्यार्थ्यांच्या शाळेतंच परीक्षा केंद्र असणार आहे. दहावी आणि बारावीच्या ऑफलाइन परीक्षेची जबाबदारी प्राचार्यांवर असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतरंही बोर्ड ऑफलाइन परीक्षेच्या तयारीला लागलंय. सध्या दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात मोठा वाद सुरू आहे. परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात, यासाठी मोठी मागणी होत होती. अनेकजण या विषयावर आक्रमक असून आंदोलनही करण्यात आलं होते. मात्र बोर्ड यासंदर्भात ऑफलाइन परीक्षा घेण्यावरच ठाम होतं. त्याप्रमाणे सर्व तयारी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. उत्तरपत्रिका सध्या विभागीय बोर्डात पोहोचल्या आहेत.