रमेश चेंडके, हिंगोली : राज्यातील अनेक बाजार समित्यांचा निकाल जाहीर झाला आहे. आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला ढासळला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 5 जागा, तर महाविकास आघाडी 12 जागेवर विजयी झाली आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यानंतर एकच जल्लोष केला आहे.
कळमनुरी बाजार समितीसाठी भाजप शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला 5 जागा मिळाल्या आहेत तर महाविकासआघाडीने 12 जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेल्या कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल त्यांच्या विरोधात गेला आहे. महाविकास आघाडीने 12 जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. आमदार बांगर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
‘राज्यात सर्वत्र महाविकास आघाडीचा विजय होत आहे. धनशक्ति विरुध्द जनशक्तीचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ झालेली आहे ह्या ताकती पुढे कुणी ही पराभूत झाल्या शिवाय राहणार नाही. आज सुरू झालेली ही फटाक्यांची लढ 2024 पर्यत सगळ्या निवडणुकीत अशीच सुरू राहणार आहे. विरोधकाचे 50 खोके ह्या जनतेने लाथडले आहेत. अशी प्रतिक्रिया प्रज्ञा राजीव सातव यांनी दिली आहे.
ह्या पुढे ही यांची हीच परिस्थिती आम्ही करणार आहे. मिदे गट पैशाच्या बळावर मतदान विकत घेण्याचा प्रयत्न करत होता. प्रामाणिक मतदारांनी यांना याची जागा दाखवून दिलेली आहे. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विनायक भिषे यांनी दिली आहे.