नाशिकः साऱ्या राज्याचे लक्ष असलेली एक अतिशय महत्त्वाची बातमी. आरोग्य भरती परीक्षेतील तक्रारींचे निराकरण झाल्यानंतरच नियुक्त्याचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दोन वेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाची भरती परीक्षा 24 आणि 31 ऑक्टोबर रोजी झाली. न्यास कम्युनिकेशन या खासगी संस्थेमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. त्या ‘क’ वर्गाच्या 2739 जागांसाठी, तर ‘ड’ वर्गांच्या 3462 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. मात्र, परीक्षेपूर्वीच गोंधळ सुरू झाला. अनेकांनी उमेदवारांना हॉलतिकीट मिळाले नाहीत. अनेकांना केंद्र दुसरेच मिळाले, अशा तक्रारी होत्या. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील या शंकांचे एक पत्रकार परिषदे घेऊन नाशिकमध्ये निरसन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐन परीक्षेदिवशीही प्रचंड गडबडी झाल्या.
परीक्षेदिवशी गोंधळ
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षेदिवशी राज्यभरातील अनेक केंद्रांवर गोंधळ उडालेला दिसला. अनेक विद्यार्थ्यांनी त्याबाबत आरोप केले. विरोधी पक्षानेही सरकारला धारेवर धरले. एकट्या नाशिक विभागात गट-ड संवर्गासाठी एकूण 53 हजार 326 इतक्या उमेदवारांनी अर्ज केले होते. न्यासाने परीक्षेसाठी समन्वय नियुक्त केले. त्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले. मात्र, ऐन पेपरच्या दिवशी या समन्वयकांचे फोनच लागले नाहीत. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी काही सुटल्याच नाहीत. काही ठिकाणी पेपर फुटल्याचे आरोप झाले, तर कुठे तब्बल दोन-दोन तास उशिराने प्रश्नपत्रिका मिळआली.
उमेदवारांची यादी प्रसिद्ध
न्यास संस्थेने निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर आरोग्य विभागाने या उमेदवारांना येत्या 7 डिसेंबरच्या आत नियुक्त्या देण्याची तयारी सुरू केलीय. मात्र, परीक्षेत झालेल्या गोंधळावर साऱ्यांचे मौन आहे. या तक्रारींचे पुढे काय होणार, खरेच परीक्षेत पेपर फुटले का या सह इतर अनेक प्रश्नांचे मोहोळ या परीक्षेभोवताली आहे. मात्र, यातल्या एकाचेही उत्तर न देता आरोग्य विभागाने नियुक्त्यांचे घोडे दामटले आहे.
आरोग्य मंत्री म्हणतात…
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नियुक्त्यांबाबत पारदर्शक प्रक्रिया राबणार असल्याचे म्हटले आहे. टोपे म्हणाले की, आरोग्यसेवा आयुक्त आणि संचालक यांच्या देखरेखीखाली नियुक्त्याची प्रक्रिया राबण्यात येत आहे. ती पारदर्शकपणे राबण्यात येईल. जिथे परीक्षेत गोंधळ झाला, तक्रारी आहेत, त्यांचे निराकरण केल्याशिवाय नियुक्त्या दिल्या जाणार नाहीत. ज्यांना काही परीक्षेबाबत तक्रारी असतील त्यांनी आरोग्यसेवा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी आणि संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
VIDEO : Pune | CNG Price Hike : पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात वाढ, किलोमागे मोजावे लागणार इतके रूपये – tv9#cng #CNGprice #Hike #Pune pic.twitter.com/cRg4CZkkRJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2021
इतर बातम्याः
Nashik| तरुणांना मिळणार मोफत निवासी वाईन प्रशिक्षण; काय आहे पात्रता, घ्या जाणून!