नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहात की भाजपचे? उद्धव ठाकरे यांची टीका

| Updated on: Nov 12, 2024 | 5:21 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी हे प्रचार कसा करतात. ते पंतप्रधान आहेत तर त्यांनी प्रचार करु नये. त्यांच्यासाठी होत असलेला सर्व खर्च कोण करतंय असा सवाल ही त्यांनी उपस्थित केलाय.

नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहात की भाजपचे? उद्धव ठाकरे यांची टीका
Follow us on

उद्धव ठाकरे यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘बॅग तपासायला हरकत नाही. कायदा समान पाहिजे. मला आहे तसाच कायदा मोदी, शाह आणि सत्तेतील तिघांनाही आहे. मोदी पंतप्रधान आणि शाह गृहमंत्री म्हणून येत असतील तर चूक आहे. कारण ते संविधानाने बसले आहेत. माझ्याप्रमाणे त्यांच्या बॅगा तपासल्या पाहिजे. मोदी आणि शाह यांच्या बॅगा जाताना तपासा. कारण ते महाराष्ट्र लुटून नेत आहे.’

‘माझ्यावर संशय व्यक्त केला तर त्यांच्यावर का नाही’

‘मी संतापलो नव्हतो. त्यांनी त्यांचं काम केलं. मी माझं काम केलं. जो अधिकार त्यांना आहे तो मलाही आहे. तुम्ही आम्ही सारखे आहोत. तुम्ही कुणाला तरी मते देता ना. तुम्ही मत देता म्हणजे कोणत्या तरी पक्षाचा आहे. मी मतदार म्हणून माझी तपासणी करता तुमची का नाही करायची. प्रचारक येतात. ते सोलापूर आणि पुण्यात आहे. मोदी नरेंद्र मोदी म्हणून येता की पंतप्रधान म्हणून येतात. ते येतात म्हणून एअरपोर्ट बंद केला जातो. पंतप्रधान आहात तर पक्षाचा प्रचार करू नये. त्यांची बॅग का तपास करत नाही. माझ्यावर संशय व्यक्त केला. तर त्यांच्यावर का नाही.

मोदींनी प्रचार करता कामा नये – ठाकरे

गेल्यावेळी मोदींची पुण्यात लोकसभेला सभा होती. तेव्हा लष्कराच्या छावणीचं रुप आलं होतं. हा खर्च कोण करतो. कुठून होतो. मला जायचं तिथे मोदी येणार म्हणून एअरपोर्ट बंद केलं. म्हणजे आम्ही प्रचार करायचा नाही. ते मात्र प्रचार करणार. काल ताफा अडवला नाही. इतरवेळी आम्ही जाताना, आज मला जायचं तर मोदी येणार म्हणून एअरपोर्ट बंद. त्यांची जशी सभा तशी माझी सभा. त्यांचं विमान कुठलं आहे. सर्व सेक्युरिटी कुठली आहे. त्यांनी खर्च करू नये. मोदींनी प्रचार करता कामा नये. पंतप्रधान म्हणून येऊ नये. त्यांनी पंतप्रधान म्हणून मणिपूरमध्ये जावं. तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात की भाजपचे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केली आहे .