राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला शेलारांचं खोचक प्रत्युत्तर; म्हणाले ज्यांना निवडून येता येत नाही ते…

| Updated on: Mar 23, 2025 | 5:37 PM

एक खोक्या भाई काय घेऊन बसलात, विधानसभेत सगळेच खोक्याभाई आहेत अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. राज ठाकरे यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना आशिष शेलार यांनी खोचक टोला लगावला आहे.

राज ठाकरेंच्या त्या टीकेला शेलारांचं खोचक प्रत्युत्तर; म्हणाले ज्यांना निवडून येता येत नाही ते...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मोठी बातमी समोर येत आहे. मनसेच्या पदाधिकारी बैठकीत बोलताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी यावेळी जोरदार हल्लाबोल केला.  एक खोक्याभाई काय घेऊन बसला आहात, विधानसभेत सगळे खोक्याभाईच भरले आहेत. मुळ विषय राहतात बाजूला तुम्हाला भलत्याच विषयांमध्ये भरकटून टाकलं जात आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देताना खोचक टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले शेलार?

एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी करणे, आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेण्यासाठी बोलणं हे आता महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत जे लोक काम करत आहेत, ते निवडून आले आहेत. त्या लोकांना जनतेनं निवडून दिलेलं आहे. ज्यांना निवडून येता येत नाही, त्यांना लोक निवडून देत नाहीत. त्यामुळे विधानसभेत न जाता ते विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

राज ठाकरे यांनी काय म्हटलं? 

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मुंबईत काही नव्या पदरचना करण्यात आल्या आहेत, यावेळी  मनसेच्या पदाधिकारी बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. एका खोक्या भाईचं काय घेऊन बसला आहात, विधानसभेत सगळे खोक्या भाईच भरलेले आहेत, त्यामुळे मुळ विषय बाजूला राहतात,  तुम्हाला भलत्याच विषयांमध्ये भरकटून टाकलं जातं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या टीकेला आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

मनसेकडून नव्या पदरचना 

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मुंबईत काही नव्या पदरचना करण्यात आल्या आहेत. संदीप देशपांडे यांच्याकडे मुंबईच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अमित ठाकरे यांना शाखाध्यक्ष करण्यात आलं आहे. कोणी -कोणी काय-काय करायचं, कामची चौकट कशी असणार? हे मी आता त्यांना दोन एप्रिलला सांगणार आहे, असंही यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.