मुंबईः राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना आरोपांची माळ दिवाळीआधीच पेटवून हैराण करणारे भाजप नेते किरीट सोमय्या हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. अशोक चव्हाण यांच्या कुटुंबाला तब्बल 300 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कथित घोटाळ्यांच्या आरोप-प्रत्यारोपाला पुन्हा एकदा ऊत येणार असून, सोमय्यांनी आता नांदेड आणि धर्माबादला जाण्याचा इशारा दिला आहे.
40 चोरांची चौकशी होणार
गेले काही दिवस शांत असलेले भाजप नेते किरीट सोमय्या आज बुधवारी पुन्हा एकदा आक्रमक झालेले दिसले. त्यांच्या निशाणावर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण आहेत. यावेळी सोमय्या म्हणाले की, आयकर खात्याने आज पुन्हा नांदेड, धर्माबाद शाखेत छापा मारला आहे. अशोक चव्हाण कुटुंबाला 300 कोटींचे कर्ज देण्यात आले आहे, असा खळबळजनक दावाही सोमय्यांनी केला. याचा पाठपुरावा करण्यासाठी आपण नांदेड, धर्माबादला जाणार आहोत. बुलढाणा अर्बन नागरी पतपेढीचा दुरुपयोग झाला आहे, असा आरोपही सोमय्यांनी केला.
खोतकर हिरवे
किरीट सोमय्यांनी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यावरही आज जोरदार टीका केली. ते म्हणाले आज बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे आणि तिकडे अर्जुन खोतकर हिरवे झाले आहेत. याचाही पाठपुरावा मी करणार आहे. जनतेला या घोटाळेबाजांचा हिशोब पाहिजे. ऊद्धव ठाकरेंकडे अर्जुन आहेत, त्यांना पैसे हवे आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
हिंदूंना सेकंड सिटीझन बनण्याचा कट
सोमय्या पुढे म्हणाले की, आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हिंदूंची अवहेलना करायचे. आता संजय राऊतांची भाषा ऐका. काय म्हणे तर आम्ही सगळ्या हिंदूंच्या मागे. हिंदूंना सेकंड सिटीझन बनवण्याचा कट सुरू आहे. हिंदूंना द्वितीय नागरिक बनवणे मान्य नाही, असा आरोप त्यांनी केला.
चव्हाण, खोतकरांचा समाचार घेणार
महाविकास आघाडी सरकारने 200 वर्षे कराज्य करावे, पण लूटमार बंद करावी, असे आवाहन त्यांनी केले. अशोक चव्हाण, अर्जुन खोतकर यांचा समाचार घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. शिवाय 31 डिसेंबरपर्यंत अलीबाबा 40 चोरांची चौकशी होईल. त्यातले अर्धे जेलमध्ये आराम करतील, असा दावाही त्यांनी केला.
Health Care : फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा अधिक!https://t.co/utzB0ZkKLN | #Healthcare | #Water | #dangerous | #Healthcaretips | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 15, 2021
इतर बातम्याः
बाळासाहेबांचं हिंदुत्व राष्ट्रीयत्वाला धरून, भागवतही म्हणालेले आमचा DNA एक, खासदार सावंतांकडून उजाळा
Nashik|पैल्या धारंच्या प्रेमानं साला…हळदीत गाणं वाजलं अन् लग्नाआधीच नवरदेवाची पोलिसांनी काढली वरात!