विरोधकांच्या मागणीला यश? या मतदार संघात फेरमतमोजणी होणार?

| Updated on: Nov 27, 2024 | 10:11 AM

evm machine: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरण्यात आलेली मतदान यंत्र (ईव्हीएम) सील करण्यात आली आहे. ही यंत्रे आता 45 दिवस सील राहणार आहे. एखाद्या उमेदवाराने निकालावर आक्षेप घेतल्यास न्यायालयान प्रक्रियेसाठी 45 दिवसांचा कालावधी लागतो.

विरोधकांच्या मागणीला यश? या मतदार संघात फेरमतमोजणी होणार?
evm machine
Follow us on

Maharashtra Assembly Election Results: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निकालात महायुतीला प्रचंड यश मिळाले. महाविकास आघाडीचा दारुन पराभव झाला. त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. त्याविरोधात आवाज उठवण्याची तयारी विरोधकांकडून करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली आहे. नाशिक पश्चिम मतदार संघात पुन्हा फेर मतमोजणी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केली आहे. त्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी फेरमतमोजणी होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भातील पत्र नाशिकच्या जिल्हाधिकारींनी सुधाकर बडगुजर यांना दिले आहे.

काय लागला होता निकाल

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे या विजयी झाल्या होत्या. त्यांना 1 लाख 40 हजार 773 मते मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा पराभव झाला. त्यांना 72 हजार 661 मते मिळाली. मनसेचे दिनकर पाटील यांना 46 हजार 390 मते मिळाली. या निकालावर सुधाकर बडगुजर आणि दिनकर पाटील यांनी आक्षेप घेतला. त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली.

जिल्हाधिकारींनी दिले पत्र

महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक आयोगकडे पत्र व्यवहार केला आहे. त्यामुळे आता एकूण असलेल्या बुथ पैकी पाच टक्के बुथवर फेर मतमोजणी होण्याची शक्यता आहे. फेर मतमोजणीसाठी एक बुथसाठी 40 हजार रुपये शुल्क आणि जीएसटी भरण्याचे पत्र नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुधाकर बडगुजर यांना दिले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी फेरमतमोजणी होण्याची शक्यता आहे. नाशिकच नाही तर राज्यातील अनेक ठिकाणी मतमोजणीनंतर पराभूत झालेल्या उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली.

हे सुद्धा वाचा

मतदान यंत्रे 45 दिवसांसाठी सील

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरण्यात आलेली मतदान यंत्र (ईव्हीएम) सील करण्यात आली आहे. ही यंत्रे आता 45 दिवस सील राहणार आहे. एखाद्या उमेदवाराने निकालावर आक्षेप घेतल्यास न्यायालयान प्रक्रियेसाठी 45 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे राज्यभरातील मतदान यंत्रे 45 दिवसांपर्यंत सील राहणार आहे. मतदान यंत्रासह कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट सील करुन गोदामात ठेवली आहे.