फिरायला जाताय? मग पर्यटन राजधानी तुमच्यासाठी खुली!, कोणती पर्यटनस्थळं सुरु?

| Updated on: Jun 16, 2021 | 8:10 PM

देशाची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळं 17 जूनपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिलीय.

फिरायला जाताय? मग पर्यटन राजधानी तुमच्यासाठी खुली!, कोणती पर्यटनस्थळं सुरु?
बीबी का मकबरा
Follow us on

औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता ओसरताना पाहायला मिळतोय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याची चिंता वाढवणाऱ्या औरंगाबादेतही आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतोय. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतलाय. देशाची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळं 17 जूनपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिलीय. या पर्यटनस्थळी जाण्यासाठी मात्र तुम्हाला प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळणं गरजेचं असणार आहे. (Tourist places in Aurangabad district will start from June 17 with Corona regulations)

औरंगाबादेत 7 जूनपासून अनलॉकिंगला सुरुवात करण्यात आलीय. या अनलॉकचा पुढचा भाग म्हणून औरंगाबादसह जिल्ह्यातील पर्यटनस्थळं सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी संयुक्त आदेश जारी केलाय. या आदेशानुसार उद्या, 17 जूनपासून जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देणं शक्य होणार आहे. पर्यटनस्थळं सुरु करण्यात आली असली तरी धार्मिकस्थळं बंदच राहतील, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

पालकमंत्री सुभाष देषमुखांचं ट्वीट

‘कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची संपूर्ण काळजी घेत उद्या दि. १७ जून २०२१ पासून संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे सुरू करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला यामुळे पुन्हा एकदा चालना मिळणार आहे. यावेळी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे’, अशी माहिती देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिलीय.

कोणती पर्यटनस्थळं सुरु?

  1. बीबी का मकबरा (Bibi ka Makbara)
  2. औरंगाबाद लेणी (Aurangabad Caves)
  3. वेरुळ लेणी (Ellora Caves)
  4. अजिंठा लेणी (Agantha caver)
  5. दौलताबाद किल्ला (Daulatanad Fort)

पर्यटनस्थळांसाठी नियमावली

  • सकाळच्या सत्रात 1 हजार पर्यटक
  • दुपारच्या सत्रात 1 हजार पर्यटक
  • मास्क वापरणे बंधनकारक
  • शारीरिक अंतर राखणे गरजेचं
  • सॅनिटायझर आणि आवश्यकतेनुसार फेसशिल्ड वापरणे अनिवार्य

संबंधित बातम्या :

औरंगाबादेत शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे करून तातडीने मदत द्या; जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Tourist places in Aurangabad district will start from June 17 with Corona regulations