Aurangabad Crime: कारमध्ये पैशांची बॅग ठेवून मंदिरात दर्शनासाठी गेले, वैजापुरात कांदा व्यापाऱ्याची सहा लाख रुपयांची बॅग पळवली

| Updated on: Sep 07, 2021 | 11:15 AM

कांदा मार्केटला जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चंद्रकांत यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी केली आणि ते म्हसोबाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले. त्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गाडीतील सहा लाखांची रोख रक्कम ठेवलेली बॅग गायब केल्याचे निदर्शनास आले.

Aurangabad Crime: कारमध्ये पैशांची बॅग ठेवून मंदिरात दर्शनासाठी गेले, वैजापुरात कांदा व्यापाऱ्याची सहा लाख रुपयांची बॅग पळवली
संग्रहित छायाचित्र
Follow us on

औरंगाबाद: जिल्ह्यातील वैजापूर येथे नागपूर-मुंबई हायवेवरील (Nagpur-Mumbai High Way) म्हसोबा मंदिर परिसरात एक कांदा व्यापारी कारमध्ये पैशांची बॅग ठेवून मंदिरात दर्शनासाठी गेले असता त्यांच्या  वाहनातून अज्ञात चोरट्यांनी साडेसहा लाखांची बॅग लंपास केल्याचा प्रकार घडला आहे.  काल सोमवारी दिनांक 06 सप्टेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  संबंधित कांदा व्यापाऱ्याने या चोरीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस या चोराचा तपास करत आहेत.

सकाळी 11 वाजता बँकेतून काढली रक्कम

याबाबत पोलिसांना मिळालेली माहिती अशी की, घायगाव शिवारातील कांदा खरेदी केंद्रात संत सावता ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी, चंद्रकांत ऊर्फ सुनिल पुंडलिक गायकवाड (रा. गायकवाडी) (Chandrakant Gaikwad) यांनी वैजापूर शहरातील एचडीएफसी बँकेतून (HDFC Bank, Vaijapur) सकाळी 11 वाजता त्यांच्या खात्यातून अडीच लाखांची रोकड काढली होती. तसेच त्यांच्याकडी आधीच चार लाख रुपये होते. अशा प्रकारचे त्यांच्या वाहनातील बॅगमध्ये एकूण साडे सहा लाख रुपयांची रोख रक्कम होती. ही रक्कम एमएच 04 S एफटी 4555 या क्रमांकाच्या वाहनात ठेवली असून ते याच वाहनातून कांदा मार्केटकडे निघाले होते.

दर्शनासाठी गेले अन् बॅग पळवली

कांदा मार्केटला जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चंद्रकांत यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी केली आणि ते म्हसोबाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले. नेहमीचाच रस्ता असल्याने दर्शन घेऊन येईपर्यंत बॅग सहिसलामत राहिल, असे त्यांना वाटले. याच विचाराने ते मंदिरात गेले. मात्र त्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गाडीतील सहा लाखांची रोख रक्कम ठेवलेली बॅग गायब केल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोधाशोध केल्यानंतर त्यांनी अखेर साडे सहा लाखाची रक्कम चोरी झाल्याची तक्रार करण्यासाठी पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

शेंद्र्यात तरुणाला रिक्षाचालकांनी लुटले

औरंगाबादमधील शेंद्रा एमआयडीसीकडे जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या तरुणाला दोघांनी बीड बायपास रस्त्यावर लुटले. या रोडवरील शनी मंदिराजवळ ही घटना रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. हा तरुण जालना रोडवरून शेंद्र्याला जाण्यासाठी बसला. मात्र चालकाने त्याला बीड बायपासवरील शनी मंदिराच्या रस्त्यावरील रेल्वे गेटजवळ नेले. विवेक विश्वकर्मा असे या तरुणाचे नाम असून रिक्षा चालक व त्याच्या साथीदाराने त्याला धमकावून तरुणाकडून सातशे रुपये रोख आणि दहा हजारांचा मोबाइल असा ऐवज हिसकावून घेतला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (6.5 lakh rupees bag stolen by thief in Vaijapur, Aurangabad)

इतर बातम्या- 

Aurangabad Crime: 60 किमीचा फिल्मी स्टाइल थरार, ट्रायल म्हणून कार पळवणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

Aurangabad Crime: ‘यासाठी दामलेच जबाबदार’ म्हणत मारहाण झालेल्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, भाजप-शिवसेना भिडले, पुंडलिकनगर बनले गुंडलोक नगर