जालनाः जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील (Jalna Ambad) धाकलगाव शिवारात रात्रीच्या वेळी लिंबाच्या झाडाची अवैध वृक्षतोड सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. बुधवारी मध्यरात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वृक्षतोडीवर कारवाई करयात साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अंदाजे पन्नास हजार रुपये किंमतीची 9 टन लिंबाची लाकडे व तीन लाख रुपये किंमतीचे आयशर वाहन असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन व्यापारी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.
जालना जिल्ह्यातील अंबड परिसरात गेल्या काही दिवसांपासून खुलेआम वनसंपदा नष्ट होत आहे. लिंबाचे झाड तोडण्यास कायद्याने बंदी असतानान इतर जिल्ह्यांतून येऊन अंबड तालुक्यात बस्तान मांडून काही व्यापाऱ्यांनी सर्रास वृक्षतोड सुरु ठेवली होती. विशेष करून रात्रीच्या वेळी जास्त वृक्षतोडीची वाहतूक असते. या व्यापाऱ्यांना कोणाचा वरदहस्त लाभलेला आहे, या प्रश्नच आहे. पोलिसांनी अनेक वेळा अवैध वाहतूक करणारी वाहने पकडली आणि जप्त केली. परंतु कुठेही वृक्षतोड थांबण्याचे नाव घेत नाही. वन विभाग याकडे सर्रास डोळेझाक करत असल्यानेच व्यापाऱ्यांचे अधिक मनोबल वाढत आहे, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
अंबडमधील धाकलगाव शिवारात डाव्या कालव्याजवळ लिंबाचे लाकूड तोडून एक आयशर ट्रक भरून जात होता. रात्रीच्या वेळी वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी मनकवार, वनपरिक्षेत्र अधिकारी अभय अटकळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत लाकूड आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला असून औरंगाबादचे लाकूड व्यापारी मन्सूर व अल्ताफ हे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.
इतर बातम्या-