औरंगाबादः सिल्लोड तालुक्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त टिप्परला आयशरने पाठीमागून धडक दिल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. हा भीषण अपघात सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील धानोरा फाट्याजवळ (Accident in Sillod) पहाटेच्या सुमारास झाला. अपघातात मरण पावलेले दोघेही सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) माळसिरस येथील रहिवासी आहेत.
पाचोरा येथून काही ऊसतोड कामगारांना घेऊन हा आयशर बारामतीकडे निघाला होता. धानोरा फाट्याजवळ रस्त्यावर त्याने नादुरुस्त टिप्परला मागून धडक दिली. या भीषण अपघातात कल्पनाबाई इमाजी पवार, प्रशांत विठ्ठल वाघ, हे दोघे जागीच ठार झाले. तर अन्य चार जण जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की आजूबाजूचे लोक मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी जमा झाले. दरम्यान जखमींना सिल्लोडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघाताची ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
सिल्लोड तालुक्यातील अन्य एका घटनेत बुधवारी दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. गावालगत असलेल्या पाझर तलावावर पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 20) सायकांळी चारच्या सुमारास उघडकीस आली. पोलिस व गावकऱ्यांनी बरीच शोधाशोध केल्यानंतर यातील एकाचा मृतदेह तळ्यात मिळून आला. ही घटना बाळापूर (ता. सिल्लोड) येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बाळापूर येथील गोपाल शंकर सैवर (13) व गोलू सुवर्णसिंग पाटील (14) रा. सुरोडा (ता.बोदवड) हा मामाच्या गावाला बाळापूर येथे राहत होता. हे दोघे गावालगत असलेल्या पाझर तळ्यावर पोहण्यास गेले. पाण्याच्या अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांनी अंदाज वर्तवला. घटना घडल्या नंतर दुपारी तीनच्या सुमारास ग्रामस्थंiना तळ्यावर दोघांचे कपडे व चपला आढळून आल्याने त्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक अजित विसपुते, फौजदार पवार, फौजदार राजू राठोड, विकास चौधरी हे घटनास्थळी दाखल झाले.
इतर बातम्या-
मुंबई नाशिक हायवेवर भीषण अपघात, आयशरवर धडकून पिकअप गाडीचा चक्काचूर
फेसबुक लाईव्ह जीवावर बेतलं, रेल्वेखाली येऊन चेंदामेंदा, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद