औरंगाबादः सिल्लोड तालुक्यात पूर्णा नदीवर 10 बंधारे बांधण्यास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. तसेच जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता या स्थळाची पाहणी करून बंधाऱ्याची स्थाने निश्चित करणार आहेत, अशी माहिती महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
सिल्लोड तालुक्यात 33 किमी लांब पूर्णा नादी वाहते. या नदीतून वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी 10 बंधारे बांधण्यास जलसंपदा मंत्री यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जलआराखडा तयार करताना पाटबंधारे महामंडळाने अडीच टीएमसी क्षमतेच्या सिल्लोड प्रकल्पाकडे तसेच 14 दलघमी क्षमतेच्या पोखरी प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. तसेच तापी खोरे महामंडळाने अजिंठा येथील 70 दलघमी क्षमतेच्या निजामकालीन बंधाऱ्याकडे दुर्लक्ष केले. जल आराखड्यात यांचा समावेश न झाल्याने सिल्लोड तालुक्याचा सिंचन विकास रखडला होता. मात्र आता या 10 बंधाऱ्यांना मंजुरी मिळाल्यानंतर सिल्लोड तालुक्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होईल. सध्याचे 12 टक्क्यांवर असलेले सिंचन क्षेत्र 52 टक्क्यांपर्यंत जाईल, अशी आशा अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली आहे.
इतर बातम्या-