Aurangabad | विविध देशांचे राजदूत औरंगाबादेत, ऑरिक सिटीत आज विदेशी गुंतवणूक व पर्यटन संधीवर परिषद

| Updated on: Mar 26, 2022 | 1:52 PM

DMIC च्या औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी अंतर्गत शेंद्रा व बिडकीन परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या परिषदेमुळे ऑटोमोबाइल, इलेक्ट्रिक व्हेईकल, इलेक्ट्रॉनिक्स, फुड प्रोसेसिंग तसेच टेक्स्टटाइल्स या क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Aurangabad | विविध देशांचे राजदूत औरंगाबादेत, ऑरिक सिटीत आज विदेशी गुंतवणूक व पर्यटन संधीवर परिषद
औरंगाबाद ऑरिक सिटी
Follow us on

औरंगाबाद | जागतिक पातळीवर पर्यटन राजधानी औरंगाबादची (Aurangabad tourism) चर्चा व्हावी तसेच येथील औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढावी, या उद्देशाने आज औरंगाबादमध्ये विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शवनिवारी ऑरा ऑफ ऑरिक या विदेशी गुंतवणूक (Investment) व पर्यटन संधीबाबतच्या परिषद पार पडत आहे. या परिषदेत मंत्री, अधिकारी तसेच विविध 10 देशांचे राजदूत सहभागी होत आहेत. या परिषदेला उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai),   उद्योग राज्यमंत्री आदित तटकरे आदींची उपस्थिती असेल. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील या दौऱ्यासाठी उपस्थित राहणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती हाती आली आहे.

उद्योगांना चालना मिळण्याचा उद्देश

DMIC च्या औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी अंतर्गत शेंद्रा व बिडकीन परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या परिषदेमुळे ऑटोमोबाइल, इलेक्ट्रिक व्हेईकल, इलेक्ट्रॉनिक्स, फुड प्रोसेसिंग तसेच टेक्स्टटाइल्स या क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळणार आहे. परिषदेला उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे आदींची प्रमुख उपस्थिती राहिल. तसेच उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, एमआयडीसीचे सीईओ पी. अनबलगन, एआयटीएलचे व्यवस्थापकीय संचालक ए.एस. रंगा नायक, एआयटीएलचे सहव्यवस्थापकीय संचालक जितेंद्र काकुस्ते, रशियन विकास परिषदेचे सदस्य अलेक्झांडर प्रेमिनोव, तैवान चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष जेनिफर मखेचा, जेट्रोचे महासंचालक मुनेनोरी मस्तुंगा, वाणिज्य आयुक्त स्वीस बिझनेस हब विजय अय्यर आदी उपस्थित राहणार आहेत.

कोणत्या देशांचे वाणिज्य राजदूत आले?

औरंबादमधील या परिषदेसाठी सिंगापूरचे राजदूत चिआँग मिंग फूंग, उपराजदूत झ्याक्यअस लिम, स्वीडनचे राजदूत ऐना लेकवाल, जर्मनीचे राजदूत मरजा सिरक्का इनिंग, कोरियाचे राजदूत योंग ओग किम, इस्रायलचे राजदूत कोबी शोशानी, नेदरलँडचे राजदूत अल्बट्रस विल्हेल्मस डी जोंग, रशियाचे राजदूत अलेक्सी सुरोवत्सेव, उपराजदूत गोओर्गी ट्रेअर हे शुक्रवारी संध्याकाळीच शहरात दाखल झाले आहेत.

इतर बातम्या-

Supreme Court : दिव्यांगांसाठी खुशखबर, दिव्यांगही IPSसाठी अर्ज करू शकतात, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मुलीची घोड्यावरून वरात काढत सांगळे कुटुंबीयांकडून स्त्री पुरूष समानतेचा संदेश