देवगिरी महानंद या नावाने मराठवाड्यातील बाजारपेठेत स्थान मिळवलेल्या औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघाच्या (Aurangabad District cooperative Milk Union) निवडणुकीची प्रक्रिया वेग घेत आहे. संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जात आहेत. यापैकी 25 जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. 11 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली आहेत. या निवडणुकीत 14 जागांसाठी तब्बल 99 जणांनी अर्ज दाखल केले होते.
– औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 14 जागांसाठी 24 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती.
– 27 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार होती.
– 11 जानेवारीपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे.
– 12 जानेवारी रोजी चिन्हांचे वाटप केले जाणार
– 22 जानेवारी रोजी मतदान होईल
– 23 जानेवारी रोजी मतमोजणी होईल.
सध्या औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर सर्वपक्षीय संचालक मंडळ कार्यरत आहे. भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे हे संघाचे अध्यक्ष आहेत तर शिवसेनेचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचे समर्थक नंदलाल काळे हे उपाध्यक्ष आहेत. काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी यंदा प्रत्येक जागेसाठी उमेदवार उभे केले आहेत. दूध महासंघासाठी एकूण 350 मतदार मतदान करतील. यापैकी फुलंब्रीत 81 तर औरंगाबाद तालुक्यात 61 मतदार आहेत. या दोन्ही तालुक्यांत आमदार हरिभाऊ बागडे आणि माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यात राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी धडपड दिसून येईल.
इतर बातम्या-