औरंगाबाद जिल्ह्यासह (Aurangabad Corona) मराठवाड्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी सोमवारी आणखी कमी झाल्याचे नोंदवले गेले. मराठवाड्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची (Corona Positive) संख्या 1471 वर पोहोचली. तर कोरोनामुळे 14 जणांचा मृत्यू झाले. औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी पाच जणांचा मृत्यू झाल्याने काहीशी चिंता वाढली तर कोरोना रुग्णसंख्या तीनशेच्या आतच रोखली गेल्याने आरोग्य यंत्रणेला (Health System) दिलासा मिळाला. जिल्ह्यात सोमवारी 290 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर जिल्ह्यात 5814 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असली तरीही कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सक्ती कायम राहिल, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती नियंत्रणात असली तरीही लसीकरणाचे प्रमाण मात्र अपेक्षेपेक्षा कमीच आहे. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 28,03,017 अशी आहे तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 15,37,226 एवढी आहे. जिल्ह्यातील एकूण लसीकरण झालेल्यांची संख्या 43,60,058 एवढी आहे. नियोजित उद्दिष्टापेक्षा हे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांच्या काल झालेल्या बैठकीत आणखी काही नवे नियम करण्यात आले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला जि.प. सीईओ निलेश गटणे, पोलीस उपायुक्त उज्ज्वला वनकर, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. सुधाकर शेळके उपस्थित होते.
इतर बातम्या-