औरंगाबादः राज्यातील मॉल आणि सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीसाठी (Wine sale policy) मुभा देण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयाविरोधात औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी कडाडून टीका केली होती. आज त्यांच्या नेतृत्वात एमआयएम पक्षाच्या नतीने शहरात आंदोलन करण्यात आलं. शहरातील एका जरी दुकानात वाइन आली तर मी स्वतः हे दुकान आधी फोडणार, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. हिंमत असेल तर माझ्या औरंगाबाद शहरात (Aurangabad City) वाइन दुकानात ठेवून दाखवा, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर एमआयएमने आज गुरुवारी शहरातील क्रांती चौकात सरकारच्या वाइन विक्री धोरणाविरोधात निदर्शनं केली.
सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देणाऱ्या निर्णयाचा औरंगाबाद एमआयएम पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला. आज गुरुवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी क्रांती चौकात आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत निदर्शने करण्यात आली. यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी फलक हातात धरून सरकारनिरोधात घोषणा दिल्या. आघाडी सरकारच्या सुपर मार्केटमध्ये विक्री निर्णयाचा एम आय एम औरंगाबाद च्या वतीने क्रांती चौकात आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत निदर्शने करण्यात आली. यावेळी या आमच्या कार्यकर्त्यांनी फलक हातामध्ये धरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
वाइन विक्रीच्या धोरणाविरोधात सरकारला इशारा देताना खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. तुमच्यात हिंमत असेल तर औरंगाबादमधल्या दुकानात वाइन ठेवून दाखवा. एका चांगल्या कामासाठी आम्हाला कायदे मोडावे लागले तर आम्ही पुढे मागे पाहणार नाही, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी वाइनचं धोरण आणलं, असं महाविकास आघाडी म्हणत असेल तर काही दिवसांनी दुकानात चरस आणि गांजाही ठेवाल. तेसुद्धा शेतातच पिकतं की? असा सवाले खासदार इम्तियाज जलील यांनी केला. एवढंच असेल तर दुधाचे उत्पादन आणि विक्रीच्या वाढीसाठी सरकार प्रोत्साहन का देत नाही, असाही प्रश्न खासदार जलील यांनी उपस्थित केला होता.
इतर बातम्या-