औरंगाबादः मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या माध्यमातून मिशन ग्रीन मोबिलिटी (Mission Green Mobility) अंतर्गत औरंगाबादच्या उद्योजकांनी प्रदूषण निर्मुलनाची (Pollution free) मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या काही महिन्यात तब्बल 250 चारचाकी इलेक्ट्रिक वाहने बुक करण्यात आली आहेत. त्यापैकी 101 इलेक्ट्रिक वाहनांचे नुकतेच वितरण करण्यात आले. औद्योगिक उत्पादने (Industrial products) आणि ऑटोमोबाइल हब म्हणून ओळख मिळवणाऱ्या औरंगाबादने आता प्रदुषण मुक्तीकडे वाटचाल सुरु केली असून लवकरच शहराने नियोजित केलेले उद्दिष्ट साध्य होईल. एक दिवस औरंगाबाद हे प्रदुषणमुक्त, हरित आणि स्वच्छ शहर असेल. तसेच ईव्ही हबदेखील होईल, असे प्रतिपादन टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलीटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी केले. शहरातील हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे हा कार्यक्रम पार पडला.
शहरातील मिशन ग्रीन मोबिलिटीविषयी माहिती देताना उल्हास गवळी म्हणाले, काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषणाच्या कारणावरून औरंगाबादच्या उद्योग क्षेत्रात काही निर्बंध लावले होते. यावर तोडगा काढत असताना प्रदूषण मुक्त, हरित आणि स्वच्छ औरंगाबाद व औद्योगिक परिसर करण्यासाठी मिशन ग्रीन मोबिलिटी या मिशनला सुरुवात करण्यात आली. उद्योजक आणि शहरातील नागरिकांनी याला प्रचंड प्रतिसाद गिला. त्यामुळे अल्प काळातच औरंगाबादने या क्षेत्रात मोठी प्रगती केली. पहिल्या टप्प्यात कार, नंतर इलेक्ट्रिक तीन चाकी, दुचाकी आणि बसेस रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न आहे.
Aurangabad Maharashtra citizens have set an example by placing order for 250+ electric cars at a go. 101 delivered in a glittering ceremony by Tata Motors MD. 25 women received car keys to mark women’s day. @RNTata2000 @PMOIndia @macaurangabad pic.twitter.com/xxhpH7sicV
— Ram Bhogale (@ram_bhogale) March 15, 2022
या कार्यक्रमात मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय म्हणाले, स्मार्ट सिटीच्या वतीने ईव्ही पॉलिसीची अंमलबजावणी करण्यात येत असून 60 नवीन ईव्ही स्मार्ट शहर बसेस दाखल केल्या जाणार आहेत. ईव्ही कारसाठी शहरात 200 पेक्षा जास्त चार्जिंग स्टेशन निर्माण करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला उद्योगपती राम भोगले, मानसिंग पवार, शिवप्रसाद जाजू, प्रसाद कोकीळ, आशिष गर्दे, ऋषी बागला, मुनीष शर्मा, गिरधर संगेरीया, डॉ. उल्हास गवळी, प्रशांत देशपांडे, सचिन मुळे, अभय हंचनाळ व मनीष धूत यांची प्रमुख उपस्थिती होती.
इतर बातम्या-