Aurangabad| मनसेची पाणी संघर्ष यात्रा सुरु, कार्यकर्त्यांच्या हाती रिकामे हंडे, हंड्यात नागरिकांची पत्र गोळा व्हायला सुरुवात, 25 हजारांचं टार्गेट!

| Updated on: May 14, 2022 | 12:39 PM

शहरातील टीव्ही सेंटर परिसरातून आज मनसेच्या पाणी संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. यावेळी मनसेचे शेकडो कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले. कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Aurangabad| मनसेची पाणी संघर्ष यात्रा सुरु, कार्यकर्त्यांच्या हाती रिकामे हंडे, हंड्यात नागरिकांची पत्र गोळा व्हायला सुरुवात, 25 हजारांचं टार्गेट!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) औरंगाबादमधला पाणी उचलून धरला असून आज शहरातून मोठी संघर्ष यात्रा (Sangharsh Yatra) सुरु करण्यात आली आहे. शहरातील 55 वॉर्डांमधून मनसेचे कार्यकर्ते फिरणार असून लोकांना पाणी समस्येवर (water issue) बोलतं करणार आहे. नागरिकांच्या पाणीसमस्या पत्रावर लिहून घेतल्या जाणार असून जवळपास 25 हजार पत्र मनसेचे कार्यकर्ते लिहून घेणार आहेत. औरंगाबादकरांची ही पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवली जाणार आहेत. आज शहराध्यक्ष सुमित खांबेकर, सतनामसिंग गुलाटी यांच्या नेतृत्वात मनसेच्या पाणी संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे.

टीव्ही सेंटरमधून सुरुवात

शहरातील टीव्ही सेंटर परिसरातून आज मनसेच्या पाणी संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. यावेळी मनसेचे शेकडो कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले. कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच अत्यंत विलंबाने होत असलेल्या पाणी समस्येवर महापालिका आणि स्तताधारी शिवसेनेवर ताशेरे ओढले. आज पवन नगर वॉर्डात ही यात्रा असून येथील रहिवाशांकडून उद्धव ठाकरेंसाठी पत्र लिहून घेतले जात आहेत. नागरिकांनी लिहिलेली ही पत्र मनसेचे कार्यकर्ते रिकाम्या हंड्यांमध्ये गोळा करत आहेत. शहरातून अशा प्रकारे 25 हजार पत्र गोळा केले जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा

औरंगाबादची पाणी पट्टी 50 टक्के कमी

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भरमसाठ पाणी पट्टी आणि विलंबाने होणारा पाणीपुरवठा यामुळे नागरिकांचा वाढता असंतोष पाहता पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी तातडीची बैठक घेतली. यात नवीन पाणीपुरवठा योजना मार्गी लागेपर्यंत औरंगाबादची पाणीपट्टी निम्म्याहून कमी करण्यात आली आहे. आधीची पाणीपट्टी 4050 एवढी होती, ती आता 2000 एवढी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

23 मे रोजी भाजप उतरणार रस्त्यावर

दरम्यान, भाजपनेदेखील पाणी प्रश्नी अनेकदा आंदोलन केले असून येत्या 23 मे रोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात औरंगाबादेत विराट मोर्चा काढला जाणार आहे. 25 वर्षांपासूनच्या पाणी समस्येविचा निषेध करण्यासाठी 25 हजार महिला हंडे घेऊन या मोर्चात सहभागी होतील, असं भाजप आमदार अतुल सावे यांनी सांगितलं.