औरंगाबादः अनेक दिवसांपासून थकलेलं वीजबिल (Electricity Bill) ग्राहकांनी भरावं, यासाठी यंदा महावितरणतर्फे (MSEDCL)अनोखी योजना आखण्यात आली आहे. विशेषतः मराठवाड्यातील (Marathwada) अनेक घरगुती वीज ग्राहकांचं बिल थकलं असल्याचं समोर आलं आहे. महावितरणतर्फे वेळोवेळी वीज बिल भरण्यासंबंधी आवाहन केलं जातं. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. ग्राहकांनी वीजबिल भरावे म्हणून मराठवाडा विभागात महावितरणतर्फे भ्ननाट योजना आखण्यात आली आहे. आता योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांनी आधी वीज बिल भरावे, असे आवाहन महावितरतर्फे करण्यात येत आहे. आगामी तीन महिने ही योजना सुरु राहणार असून लवकरात लवकर बील भरणाऱ्यांना बक्षीस लागण्याची शक्यता जास्त आहे.
काय आहे योजना?
- नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना ई स्कूटर, मोबाइल, फ्रिज आदी बक्षीसं दिली जाणार आहेत.
- 1 जून ते 30 ऑगस्ट पर्यंत ही योजना सुरु राहणार आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना बिल भरण्याच्या अंतिम मुदतीच्या आत सर्व बिले भरावी लागतील.
- प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला महावितरणकडून लॉटरी काढली जाईल.
- मराठवाड्यातील 101 उपविभागांतून दर महिन्याला 1 हजार रुपयांपर्यंतची प्रत्येकी 2 बक्षीसं वस्तूच्या स्वरुपात दिली जाणार आहेत.
- त्यापैकी पहिले बक्षीस हे तत्पर देयक भरणा करणाऱ्या ग्राहकाला दिले जाईल.
- तर दुसरे बक्षीस हे अंतिम मुदतीच्या आत बिल भरणाऱ्या ग्राहकासाठी असेल.
- महावितरणचे कर्मचारी वगळता मराठवाड्यातील सर्व घरगुती ग्राहकांसाठी ही योजना आहे.
- दर महिन्यात 22 विभागांतून प्रत्येकी एकाला मिक्सर ग्राइंडर किंवा तत्सम वस्तू, 9 मंडळांतून प्रत्येकी एक मोबाइल हँडसेट किंवा टॅब्लेट, 3 परिमंडळांतून प्रत्येकी एक एलईडी टीव्हीचे बक्षीस दिले जाणार आहे.
- प्रादेशिक कार्यालय स्तरावर ऑनलाइन बिल भरणाऱ्या ग्राहकांमधून प्रत्येक महिन्याला रेफ्रिजरेटरच एक विशेष बक्षीस तर प्रादेशिक कार्यालय स्तरावर इलेक्ट्रिक स्कूटर अशा बक्षीसांचा समावेश या योजनेत आहे.