औरंगाबाद महापालिका मार्चपर्यंत काढणार 300 कोटींचे कर्ज, स्मार्ट सिटी प्रकल्पात हिस्सा टाकण्यासाठी मोठे पाऊल!

| Updated on: Dec 03, 2021 | 12:14 PM

स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी महापालिकेला एकूण 250 कोटी रुपयांचा हिस्सा टाकायचा आहे. यापूर्वी 68 कोटी रुपये टाकण्यात आले आहेत. सध्या महापालिका कर्जमुक्त आहे. त्यामुळे आता नव्याने 300 कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचे ठरवले आहे.

औरंगाबाद महापालिका मार्चपर्यंत काढणार 300 कोटींचे कर्ज, स्मार्ट सिटी प्रकल्पात हिस्सा टाकण्यासाठी मोठे पाऊल!
औरंगाबाद मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय
Follow us on

औरंगाबादः स्मार्ट सिटी (Smart city) प्रकल्पाअंतर्गत शहराचा विकास करण्याकरिता औरंगाबाद महापालिकेला (Aurangabad municipal corporation) या प्रकल्पात आपल्या वाट्याचा निधी टाकायचा आहे. त्यामुळे महापालिकेने तीनशे कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचा हिस्सा वापरल्यानंतर उरलेला निधी विकास कामांसाठी वापरला जाणार आहे. याकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक आणि कार्बन झिरो बाँडच्या विक्रीतून हे कर्ज मिळवण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी सांगितले.

स्मार्ट सिटीसाठी 250 कोटींचा पालिकेचा हिस्सा

महापालिकेचे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी महापालिकेला एकूण 250 कोटी रुपयांचा हिस्सा टाकायचा आहे. यापूर्वी 68 कोटी रुपये टाकण्यात आले आहेत. महापालिकेने यापूर्वी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. सध्या महापालिका कर्जमुक्त आहे. त्यामुळे आता नव्याने 300 कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचे ठरवले आहे. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले की, मार्च महिन्यापर्यंत कर्जाची प्रक्रिया होईल. स्मार्ट सिटीचा हिस्सा काढल्यानंतर उर्वरीत रक्कम विकास कामांसाठी वापरली जाईल.

इलेक्ट्रिक बसची खरेदी करणार

शहरातील सिटी बस सेवेत सध्या शंभर स्मार्ट बस आहेत. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आता महापालिका आणखी वीस बस खरेदी करणार आहे. या बस ऐतिहासिक स्थळे आणि वारसा स्थळांच्या मार्गावर चालवल्या जातील. नवीन पाणी पुरवठा योजना सोलारवर चालवण्याच्या दृष्टीने तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती महापालिका प्रशासक पांडेय यांनी दिली.

इतर बातम्या-

सासरच्यांनी बाळ हिरावले, व्याकुळ मातेला औरंगाबादमधील दामिनी पथकाचा हात, 5 दिवसांनी आईच्या कुशीत विसावले

Mumbai Rains : मुंबईत गुरुवारी रेकॉर्डब्रेक पाऊस, डिसेंबरमधील सर्वाधिक पावसाची नोंद