औरंगाबादः मराठवाड्यातील प्रसिद्ध प्राणी संग्रहालय म्हणून ख्याती असलेल्या सिद्धार्थ उद्यानातील प्राण्यांना (Siddharth Garden Zoo) येथे जागा अपुरी पडत असल्याची नोंद केंद्र सरकारच्या एका पथकाने केली होती. त्यामुळे महापालिकेच्या वतीने मिटमिटा येथे झुलॉजिकल पार्क आणि सफारी पार्क उभारण्यात येणार आहे. यातील सफारी पार्कला याआधी मंजुरी मिळाली होती, मात्र झुलॉजिकल पार्कला सेंट्रल झू अथॉरिटी ऑफ इंडियाची मंजुरी अद्याप मिळालेली नव्हती. नुकतीच दिल्लीतील एका बैठकीत ही मंजुरी मिळाली. त्यामुळे आता मिटमिट्यातील झुलॉजीपार्क (Zoological park) आणि त्याबाजूला सफारी पार्क (Aurangabad safari park) उभारण्याच्या कामातील अडथळे दूर झाले आहेत, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त सौरभ जोशी यांनी दिली आहे.
नवी दिल्ली येथे सेंट्रल झू अथॉरिटीची 38 वी बैठक नुकतीच पार पडली. यात मिटमिटा येथील नियोजित झुलॉजिकल पार्कला मंजुरी देण्यात आली. 1972 च्या वन्य जीव कायदा मधील 38 एच (ए) (1) तरतुदीनुसार, मान्यता देण्यात आली आहे. महापालिकेला त्याबाबतचे पत्र 17 डिसेंबर रोजी प्राप्त झाले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालय मागील काही वर्षांपासून अडचणीत सापडले आहे. झू अथॉरिटीने तीन वर्षांपूर्वी या प्राणीसंग्रहालयाची मान्यता काढून घेण्याचा कटू निर्णयही घेतला होता. मात्र मनपा प्रशासनाने पाठपुरावा करून ही मान्यता काही कालावधीसाठी वाढवून घेतली. तर दुसरीकडे महापालिकेने शहराच्या बाहेर मिटमिटा येथे झुलॉजिकल पार्क आणि जंगल सफारी तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी राज्य सरकारने महापालिकेला शंभर एकर जागाही उपलब्ध करून दिली आहे. स्मार्ट सिटीच्या निधीतून सध्या तिथे पार्क उभारण्यात येत आहे. जंगल सफारीसाठी आणखी शंभर एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. मात्र झू अथॉरिटी ऑफ इंडियाने झुलॉजिकल पार्क किंवा जंगल सफारी पार्कला मंजुरी दिलेली नव्हती. आता झुलॉजिकल पार्कला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.
इतर बातम्या-
ऊसतोड कामगार महामंडळाचे लवकरच पुणे, परळीत कार्यालय; कामगार नोंदणी, वसतिगृहांसाठी 3 कोटींचे वितरण
आरोग्य सुविधा देण्यात केरळ नंबर 1, नंमहाराष्ट्राचा बर कितवा? यूपी, बिहार नेमके कुठे?