औरंगाबादः मुकुंदवाडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना एक्सप्रेस रेल्वेने (Express Railway) प्रवास करायचा असल्यास त्यांना औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर (Aurangabad railway station) यावे लागते. कारण कोणत्याही एक्सप्रेस रेल्वे मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर थांबत नाही. त्यामुळे एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करायचा असल्यास येथील नागरिकांना 15 किलोमीटरचा हेल्पाटा घालत औरंगाबाद स्टेशनवर यावे लागते. एक्सप्रेस गाड्या येथेही थांबाव्यात अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी लावून धरली आहे. मात्र व्यावसायिकदृष्ट्या ते योग्य नसल्याचे पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनला डी दर्जा मिळून पाच वर्ष लोटली आहेत. मात्र अद्यापपर्यंत स्टेशनला एक्सप्रेस रेल्वेचा थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे सिडको, मुकुंदवाडी परिसरातील रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे. जवळ स्टेशन असताना मुख्य रेल्वे स्टेशन गाठावे लागते. औरंगाबाद रेल्वे स्टेशन ते मुकुंदवाडी हे अंतर जवळपास 15 किलोमीटर आहे. सध्या मराठवाडा एक्सप्रेस ही एकमेल एक्सप्रेस आणि इतर पॅसेंजर रेल्वे येथे थांबतात. या स्टेशनवरून दररोज तीन ते पाच हजारांपर्यंत प्रवासी ये-जा करतात. येथे स्वतंत्र वेटिंग रुम आहे. तसेच प्लॅटफॉर्मवर पत्रेही बसवण्यात आले आहेत. तसेच रिझर्व्हेशनसाठी पीआरएसची सुविधाही देण्यात आली आहे. मात्र येथे अद्याप एक्सप्रेस थांबण्याची परवानगी मिळालेली नाही.
दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी औरंगाबादेत पाहणी करताना मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर तपोवन एक्सप्रेस थांबवण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु रेल्वे अदिकारी हे आश्वासन विसरले. इतर ठिकाणी चार-चार किमी अंतरावर एक्सप्रेस थांबवल्या जातात, मग मुकुंदवाडीलाच का नाही, असा सवाल मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी केले आहे.
दरम्यान, तपोवन, जनशताब्दी आणि नंदीग्राम एक्सप्रेसला थांबा देणे हे व्यावसायिक दृष्ट्या योग्य नाही, त्यामुळे थांबा देणे व्यवहार्य नसल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
इतर बातम्या-