औरंगाबादः प्रसिद्ध कंपन्यांचा बनावट माल तयार करून विक्री करणाऱ्या तिघांना औरंगाबादमध्ये (Aurangabad crime) अटक करण्यात आली आहे. या तिघांच्या ताब्यातून 1 लाख 19,830 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. साबण, टॉयलेट क्लिनर, बिड्या असा 39,320 रुपयांचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण 1 लाख 19,830 रुपयांचा माल पोलिसांनी (Aurangabad police) जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सदर कारवाई करण्यात आली. नामांकित कंपन्यांचे लेबल लावलेले बाम, साबण, टॉयलेट क्लिनर, बिड्या असे साहित्य तीन आरोपींनी लोडिंग रिक्षात टाकलेले होते. पोलिसांनी या मालाची तपासणी केली असता हा माल बोगस असल्याचे उघड झाले. या कारवाईत अक्षय जाधव, शेख मोसिन यांना ताब्यात घेण्यात आले. रिक्षात सापडलेला माल 39,320 रुपयांचा होता.
या कारवाईत पकडलेल्या आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी हा माल बीड बायपास येथील सय्यद मोहसीन मीर याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. तसेच सय्यद हा अनेकांना असा माल विकत असल्याचेही सांगितले. पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे यांनी आरोपीला शोधून कंपनीच्या अधिकाऱ्यांना सोबत घेतले व त्यास मोंढा नाका येथे ताब्यात घेतले. त्याच्याकडून 9490 रुपये किंमतीच्या बनावट बिड्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक गिरी, दुय्यम पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल देशराज मोरे व कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
इतर बातम्या-