औरंगाबादः पैठण तालुक्यातील तोंडोळी गावात (Tondoli Robbery) पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील आरोपींना शोध घेण्यासाठी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांची (Aurangabad police) तपास चक्रे वेगाने फिरत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पोलीस यंत्रणा कसून कामाला लागली आहे. मंगळवारी रात्री पडलेला दरोडा आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचा शोध घेतला जात आहे. यासाठी ग्रामीण भागात वेगवेगळ्या दिशेने तपासाची पथके (Police Investigation Teams) रवाना झाली आहे. दरम्यान गुरुवारी अनेक संशयितांची चौकशीदेखील करण्यात आली.
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची सात पथके रवाना झाली असून गुरुवारी दिवसभरात सात संशयितांची चौकशी करण्यात आली. त्यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने संबंधित गुन्ह्याची कबूली दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांच्याकडून मुख्य आरोपींची नावे मिळण्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत संपूर्ण गुन्ह्याची उकल होईल, असा विश्वास औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातील अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी दिली.
गुरुवारी राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी पीडित कुटुंबाची भेट घेतली. पीडितांचे सांत्वन केले तसेच या प्रकरणी शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच पोलिसांनाही या घटनेचा वेगाने तपास करण्याच्या सूचना दिल्या.
तोंडोळी येथील शेतवस्तीवर तीन महिन्यांपासून मध्य प्रदेशातील कुटुंब राहण्यास आले होते. यात तीन पुरुष व चार महिला होत्या. दरोडेखोरांनी या कुटुंबावर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. दरोडेखोरांनी कुटुंबातील पुरुषांना बाजूच्या खोलीत हातपाय बांधून कोंडले, तर बाहेर एकाच्या गळ्याला चाकू लावून चारपैकी दोन महिलांवर चौघांनी सामूहिक अत्याचार केला. यातील पीडिता 31 आणि 32 वर्षीय असून, त्यांना दरोडोखोरांनी घराच्या बाजूला नेत अत्याचार केले. घरातील पुरुषांना शस्त्रांचा धाक दाखवून आधीच बांधून ठेवले होते त्यामुळे ते प्रतिकार करू शकले नाहीत. एकाने मुकाबला करण्याचा प्रयत्न केला असता त्याला गंभीर मारहाण करण्यात आली. तोंडोळी येथील या घटनेत दरोडेखोरांनी रोख 36 हजार आणि बनावट दागिने लंपास केले.
तोंडोळी दरोड्यात दरोडेखोरांनी ज्या दोन महिलांवर बलात्कार केला, त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. यापैकी एक महिला 15 दिवसांची बाळंतीण असल्याचे उघड झाले आहे. पीडितेची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या प्रतिनिधींसमोर या महिलेने व्याकुळतेने हंबरडा फोडला. हमारे साथ उन लोगों ने गलत काम किया म्हणत तिने आपली व्यथा मांडली.
इतर बातम्या-