School Opens| शाळांची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची, औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागाच्या प्रशासकांचा निर्णय काय?
औरंगाबादः राज्य सरकारने सोमवारपासून पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु (School Open) करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आपापल्या शहर तसेच जिल्ह्यातील कोरोना संसर्ग लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, असेही आदेशात नमूद केले आहे. मात्र शहरातील कोरोना संसर्ग लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार, औरंगाबाद शहरातील महानगरपालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी पहिली ते 9 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय आठ दिवसांनी घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे. मात्र दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा लक्षात घेता, या वर्गांच्या शाळा सोमवारपासून सुरु करण्याची परवानगी मनपा प्रशासकांनी दिली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमधूनही शाळा सुरु करण्याची मागणी होत आहे. मात्र जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. यासंदर्भात जिल्ह्याच्या टास्क फोर्सच्या साप्ताहिक बैठकीत शाळा सुरु करण्यावर शिक्कामोर्तब होईल, असे ठरले आहे. त्यानंतर सोमवारी दुपारी शाळांना आवश्यक ते निर्देश दिले जातील, असे शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी सांगितले. जिल्ह्यातील 1347 गावांपैकी 133 गावांमध्ये लसीकरणाचा पहिला डोस शंभर टक्के पूर्ण झाला त रतिसऱ्या लाटेत आतापर्यंत 169 गावांत कोरोना पोहोचला आहे. औरंगाबाद, गंगापूर, तालुक्यातील शहरालगतच्या वाड्या, वस्त्या, गावे सर्वाधिक बाधित झाली आहेत.
शहरातील दहावी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरु होतील, असं मनपा प्रशासकांनी सांगितलं आहे. मात्र ही परवानगी देताना या दोन्ही वर्गात शिकणाऱ्या आणि लसीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी लसीचा एक डोस घेतला असेल तरच त्यांना वर्गात बसण्याची परवानगी द्यावी, शिक्षकांचे लसीकरण पूर्ण जालेले असावे, असेही प्रशासकांनी बजावले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेत, महाविद्यालयात जाऊन तपासणी करावी. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात यापूर्वीच महानगरपालिकेतर्फे एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
इतर बातम्या-