औरंगाबादः लस न घेता कोविन अॅपवर नाव नोंदणी करून लस प्रमाणपत्र घेण्याचे प्रकार औरंगाबादेत यापूर्वी उघडकीस आले आहेत. यापुढे असे प्रकार घडू नयेत, यासाठी खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. आता दर चार दिनसांनी कोविन अॅपचा पासवर्ड बदला, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी दिले आहेत.
डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बोगस लसीकरणाचा प्रकार औरंगाबादेत उघड झाला होता.यात वैजापूर तालुक्यातील मनूर प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी, नर्स तसेच शिउर प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्स आदींचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोविन अॅपवर संबंधित नागरिकांची नावनोंदणी करून, त्यांचे प्रमाणपत्र तयार केले व संबंधितांना विकल्याचा प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणातील दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे प्रकार पुढे होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या दोन-तीन कर्मचाऱ्यांकडे कोविन अॅपचा पासवर्ड असतो, त्यांनी तो दर चार दिवसांनी बदलावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोरोना तपासण्या वाढवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. अँटिदन आणि आरटीपीसीआर या दोन्ही प्रकराच्या टेस्टची संख्या वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दररोज किमान 2 हजार तपासण्या व्हाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
इतर बातम्या-